महत्वाच्या बातम्या

 सम्यक विद्यार्थी आंदोलन चंद्रपूर जिल्ह्याच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : UGC ने सर्व विद्यापीठे आणि महाविद्यालयांना पत्राद्व्यारे अभाविप चे संस्थापक दत्ताजी डीडोळकर यांचे जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याच्या सूचना दिल्या आहेत, याचा सम्यक विद्यार्थी आंदोलन वतीने महाराष्ट्र भरात जाहीर निषेध करण्यात येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याच महाविद्यालयामध्ये व गडचिरोली विद्यापिठात ABVP चे संस्थापक यांचा जनशताब्दी साजरा करू देणार नाही. असा इशारा उपजिल्हाधिकारी तथा अपर जिल्हादंडाधिकारी चंद्रपूर संजय ग. पवार यांच्या मार्फत देण्यात आला.

त्याच अनुषंगाने काल ४ डिसेंबर २०२३ सोमवार रोजी चंद्रपूर उपजिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले. 

यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलन चे मार्गदर्शक विद्यार्थी नेते धिरज तेलंग, जि. महासचिव प्रशांत गणविर, कोषाध्यक्ष प्रशिक खांडेकर, विल्सन कोवले, क्षितिज इंगळे, निकिता कांबळे, भिमराज बागेसर, सनी उराडे आदी पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते‌.





  Print






News - Chandrapur




Related Photos