२ सप्टेंबरपासून महानगरपालिका तसेच नगरपालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर  २ सप्टेंबरपासून महानगरपालिका तसेच नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय  राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत   घेण्यात आला आहे.
  गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कर्मचाऱ्यांकडून सातवा वेतन आयोग लागू करण्याची मागणी जोर धरत होती. मंगळवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत २ सप्टेंबरपासून महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याला मान्यता देण्यात आली आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-23


Related Photos