महत्वाच्या बातम्या

 देशातील युवा तरुणांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे : इंजि. प्रमोद पिपरे


- अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर च्या वतीने तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य पुण्यतिथी महोत्सव समारोपिय कार्यक्रम

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : देशातले तरुण हे राष्ट्राचे भावी आधारस्तंभ आहेत. ते बलोपासक असावेत म्हणजे ते समाजाचे व राष्ट्राचे संरक्षण करू शकतील. ते नीतिमान व सुसंस्कृतयुक्त कसे होतील, याविषयीचे उपदेशपर व मार्गदर्शनपर लेखन तुकडोजी महाराज यांनी केले आहे. या राष्ट्रसंताने आपल्या लेखनातून व्यसनाधीनतेचा तीव्र निषेध केला आहे. याकरीता देशातील युवा तरुण पिढींनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे विचार आत्मसात करावे, असे प्रतिपादन लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोद पिपरे यांनी केले.

अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ शाखा रामनगर च्या वतीने वंदनीय राष्ट्रसंत श्री. तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी निमित्य पुण्यतिथी महोत्सव समारोपीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणुन इंजि. प्रमोद पिपरे बोलत होते.

याप्रसंगी अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे जिल्हा सेवाधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे, भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीता पिपरे, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे उपग्राम सेवाधिकारी अरविंद वासेकर, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे सचिव पंडितरावजी पुडके, अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ गोकुलनगरचे ग्रामसेवाधीकारी एस.पि. वेठे, दिवाकर पिपरे, शामराव नैताम, घनश्याम जेंगठे, संजयजी बर्वे, देवराव भोगेवार, अविनाश शंखदरवार, अमित तिवाडे, रमेश भुरसे, सखाराम येलेकर, पुरुषोत्तम कुळमेथे, गुलाबराव मडावी, मंदा मांडवगडे तसेच अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळचे पदाधिकारी व सभासद उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व प्रास्ताविक अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ रामनगरचे ग्रामसेवाधीकारी सुरेश मांडवगडे यांनी केले तर आभार सहकोषाध्यक्ष संजय रामगुंडेवार यांनी मानले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos