शिक्षक कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा


- शिक्षक समिती चामोर्शीने पंतप्रधान व मुख्यमंत्री यांना तहसीलदार मार्फत पाठविले निवेदन 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / आष्टी :
आज शिक्षक समितीच्या स्थापना दिवसाचे औचित्य  साधून  महाराष्ट्र शिक्षक समिती चामोर्शीच्या वतीने देशभरातील शिक्षक, कर्मचारी यांना जुनी पेन्शन लागू करावी, यासाठी डी. सी. पी. एस. व एन. पी. एस. योजना बंद करण्याचे निवेदन तहसीलदार चामोर्शी   संजय गंगथडे  यांच्या मार्फत  पंतप्रधान नरेंद्र मोदी व  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निदवेदन देण्यात आले. 
 देशभरात १ जानेवारी  नंतर केंद्र सरकारच्या सेवेतील कर्मचारी व महाराष्ट्र राज्यातील १ नोव्हेंबर २००५ पासून नियुक्त झालेल्या कर्मचारी,शिक्षकांची मूळची पेन्शन योजना बंद करून DCPS मध्ये आणून त्यानंतर NPS योजने मध्ये वर्ग करण्यात आले आहे. सदर योजना शाश्वत नसून कर्मचारी,शिक्षकांना त्यांचे वृद्धावस्थेत कोणताही आधार देण्यास सक्षम ठरणारी योजना नाही. त्याचप्रमाणे DCPS/NPS योजनेत कुटुंब निवृत्ती वेतन नसल्याने शिक्षकांच्या मृत्यू नंतर कुटुंबातील सदस्य यांना निराधार करणाऱ्या व त्यांचे भविष्य उधवस्थ करणाऱ्या योजना आहेत. त्यामुळे ह्या योजना बंद करून केंद्र व राज्य शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी विनंती निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चामोर्शीच्या वतीने करण्यात आली आहे. 
 या प्रसंगी शिक्षक समितीचे नरेंद्र कोत्तावार, जे बी गेडाम, अनिल बारई, पुरुषोत्तम पिपरे, राजेश बाळराजे, संजय लोणारे,हरेंद्र सिकदार, ओमप्रकाश साखरे , भाष्कर शेंडे, संतोष लाजूरकर, हरी गेडाम, दिलीप बुरांडे, माणिक वरपडे,दीपक केंद्रे, जितेंद्र मुत्सद्दीवार, सुशंकर मुजुमदार, पाटील सिरसाट व शिक्षक समितीचे इतर पदाधिकारी उपस्थित होते . 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-22


Related Photos