‘चांद्रयान -२ ‘ अवकाशात उड्डाणासाठी सज्ज : उद्या दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी अवकाशात घेणार झेप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / श्रीहरिकोटा :
भारतासह  संपूर्ण जगाचे लक्ष लागलेल्या ‘चांद्रयान -२’च्या प्रक्षेपणासाठी आता अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे १५  जुलै रोजी प्रक्षेपण होऊ न शकलेले ‘चांद्रयान -२’ आता प्रक्षेपणासाठी पुन्हा सज्ज झाले आहे. सोमवार २२ जुलै रोजी दुपारी २ वाजून ४३ मिनिटांनी ते अवकाशात झेपावेल. सप्टेंबर २०१९  पर्यंत चांद्रयान चंद्राच्या पृष्ठभागावर पोहोचेल असा अंदाज आहे.
१५  जुलै रोजी पहाटे २ वाजून ५१  मिनिटांनी श्रीहरिकोटामध्ये सतीश धवन सेंटर येथील जीएसएलव्ही मार्क-३ च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपावणार होते परंतु तांत्रिक बिघाडामुळे प्रक्षेपणाच्या अवघ्या ५६ मिनिटे आधी उड्डाण रद्द करण्यात आले. ‘आपल्याजवळ अद्ययावत यंत्रणा आहे. त्यामुळे आपण कुठे बिघाड आहे हे ओळखू शकलो, भविष्यात मोठी अडचण निर्माण होण्यापेक्षा त्यावर आधीच उपाय योजना करणं हे केव्हाही चांगलंच म्हणून आम्ही मोहीम रद्द केली’ अशी माहिती इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी दिली आहे.
  Print


News - Rajy | Posted : 2019-07-21


Related Photos