महत्वाच्या बातम्या

 मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यामध्ये महिलांच्या संदर्भात असणाऱ्या शासकिय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान राबविण्याबाबत शासनाने निर्देश दिलेले आहेत. 

सदर अभियान नगर परिषद, गडचिरोली कार्यालयामार्फत ०१ डिसेंबर २०२३ रोजी शुक्रवारला आठवडी बाजार परिसर येथे राबविण्यात आले असुन सदर कार्यक्रमात अध्यक्ष मुख्याधिकारी सुर्यकांत पिदुरकर, उद्घाटक माजी नगराध्यक्षा श्रीमती योगिता पिपरे, श्रीमती सविता गाविंदवार, सहायक प्राध्यापीका, गाँडवाना विश्वविद्यालय, निशा गेडाम सामाजिक कार्यकर्त्या, माजी नगरसेवक श्रीमती वैष्णवी नैताम, श्रीमती लता लाटकर, मुक्तेश्वर काटवे, संजय मेश्राम, केशव निंबोळ व सामाजीक कार्यकर्त्या श्रीमती करकाटे तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात विविध योजनांचे १८ स्टॉल लावलेले असून त्यात एकुण १ हजार २८२ महिला उपस्थित होत्या. सदर महिलांना विविध योजनेअंतर्गत ६ हजार ७०० लाभांचे वितरण करण्यात आले.

सदर कार्यक्रमाचे संचालन श्रीमती वंदना गेडाम व श्रीमती संध्या चिलमवार, सहा. शिक्षीका, नगर परिषद, गडचिरोली यांनी केले. सदर कार्यक्रमात रांगोळी स्पर्धा आयोजीत करण्यात आलंनो असुन प्रथम पारितोषीक रु. ३०००/- व शिल्ड श्रीमती प्रणोती नंदकिशोर मुसळे व द्वितीय पारितोषीक त. २०००/- व शिल्ड श्रीमती वर्षा पवन डोंगरवार यांना प्रदान करण्यात आलेला आहे. समूह नृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषीक रु. ३०००/- शिल्ड राजीव गांधी नगर परिषद प्राथ. शाळा व द्वितीय परितोषीक रु. २०००/- व शिल्ड सोनवाने गृप नगर परिषद गडचिरोली यांना प्रदान करण्यात आलेला आहे. तसेच संगित खुर्ची विजेत्या श्रीमती रुपाली नैताम यांना रु. ३०००/- व शिल्ड प्रदान करण्यात आलेले आहे. 

सदर कार्यक्रम यशस्विरीत्या पार पाडणेकरीता, नगर परिषद, गडचिरोली कार्यालयाचे सर्व अधिकारी / कर्मचारी तसेच नगर परिषद शाळेतील शिक्षकवृंद व विद्याथ्यांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाचे अभार गणेश नाईक, NULM विभाग, नगर परिषद, गडचिरोली यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos