महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आंतरमहाविद्यालयीन धनुर्विद्या स्पर्धा ५ डिसेंबर पासून


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने प्रिन्सिपल अरुणराव कलोडे महाविद्यालय यांच्या सहकार्याने आंतर महाविद्यालयीन पुरुष व महिला धनुर्विद्या स्पर्धेचे आयोजन ५ ते ७ डिसेंबर दरम्यान कलोडे महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले आहे.
स्पर्धेचे उद्घाटन ५ डिसेंबरला सकाळी १० वाजता ओंकार नगरातील कलोडे महाविद्यालयात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. राजू हिवसे यांच्या हस्ते होणार आहे. 

याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून साईबाबा लोकसेवा संस्था सचिव किशोर उमाठे तर प्रमुख अतिथी म्हणून साईबाबा लोकसेवा संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. ओंकार उमाठे उपस्थित राहणार आहे. याशिवाय विशेष अतिथी म्हणून नागपूर विद्यापीठ क्रीडा विभागाचे संचालक डॉ. शरद सुर्यवंशी, साईबाबा लोकसेवा संस्था सदस्य डॉ. डी. आर. सातपुते उपस्थित राहणार आहे.

रिकव्हर, इंडियन, कपांउड या प्रकारात होणाऱ्या या स्पर्धेत सुमारे दोनशे एवढे खेळाडू सहभागी होण्याची शक्यता आहे. खेळाडूंनी स्पर्धेसाठी लागणाऱ्या आवश्यक त्या कागदापत्रासह स्पर्धेस्थळी उपस्थित राहण्याचे आवाहन नागपूर विद्यापीठाच्या क्रीडा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos