महत्वाच्या बातम्या

 अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करा 


- जनता की पार्टी चाबी संघटनेने उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना दिले निवेदन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गोंदिया : जनता की पार्टी चाबी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी गोंदिया व माननीय तहसीलदार गोंदिया यांना गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे नुकसानीचा लवकरात लवकर पंचनामा करण्याची विनंती केली असता पंचनामे करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. मंगळवार, २८ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. जनता की पार्टी चाबी संघटनेच्या अधिकाऱ्यांच्या विनंतीवरून तहसीलदार गोंदिया यांनी आदेश काढून पत्राद्वारे तालुक्यातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांना शेतकरी व नागरिकांच्या झालेल्या नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

सर्व कार्यकर्त्यांनी व लोकप्रतिनिधींनी आपापल्या भागातील पंचनामे करण्यासाठी संबंधित अधिकार्‍यांशी संपर्क साधून नागरिकांना व शेतकर्‍यांना मदत करावी, असे आवाहन जनता की पार्टी चाबी संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

मुंबईत आमदारांनी तर स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांनी मोर्चा सांभाळला आमदार विनोद अग्रवाल यांनी मुंबईत राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली, तर गोंदिया जिल्ह्यात जनता की पार्टी चाबी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्थानिक अधिकाऱ्यांची भेट घेऊन नुकसान भरपाई त्वरित मिळावी, यासाठी पंचनामा शीघ्र गतीने करण्याची मागणी केली.





  Print






News - Gondia




Related Photos