सिरोंचा येथील वसतिगृहात महिला आधिक्षका , कर्मचारी नसल्याने शंभराहून अधिक विद्यार्थिनींनी सोडली शाळा


- अनुसुचीत नवबौध्द  शाळेत कर्मचारी नियुक्त करा अन्यथा शाळाच  बंद करण्याची मुलींची मागणी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / सिरोंचा :
येथील अनुसूचित  नवबौध्द शाळेतील वसतिगृहात २०१३ पासून अधीक्षका  व महिला कर्मचाऱ्यांचे पद रिक्त असल्याने तब्बल  १०० विद्यार्थिनींनी शाळा सोडून गावचा रस्ता पकडल्याचा प्रकार उघडीस आला आहे. जेवणामध्ये अळ्या आढळून आल्याच्या प्रकारानंतर आता विद्यार्थिनींच्या शाळा सोडल्याचा प्रकार समोर आला असून विद्यार्थिनींनी शाळाच बंद करण्याची मागणी केली आहे. 
१७ जुलै रोजी पञ देऊन २० जुलै पर्यंत   आधिक्षका उपलब्ध न झाल्यास आम्ही शाळा बंद करू व परत गावी जाऊ  असा इशारा विद्यार्थिनींनी दिला होता. मात्र कोणतीही दखल घेण्यात न आल्याने आज सकाळी २० ते  २५ मुली घरी परतल्या.  यानंतर शंभर हुन अधिक मुलींनी घरचा रस्ता पकडला.  अधीक्षिका रूज झाल्यास  मुलींना परत पाठवू नाही तर शिक्षण बंद करू असा इशाराही पालकांनी दिला. 
संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासकीय अनु.जाती (नवबौध्द) मुलींच्या निवासी शाळा एकूण ८१ आहेत. त्यापैकी गडचिरोली जिल्ह्यात  दोन शाळा आहेत. एक अहेरी-वांगेपल्ली येथे व दुसरी सिरोंचा येथे. सिरोंचा येथील शासकीय अनु. जाती नवबौद्ध  मुलींची शाळा २०१३ ला सुरू करण्यात आली. या शाळेत वर्ग ६ ते १० वी पर्यंत शिक्षण असून एकूण पटसंख्या १८४  आहे.  यात मुलींसाठी वसतिगृहाची व्यवस्था करण्यात आली. यात भोजनही दिल्या जातो पण सात दिवसापासुन निकृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थिनींना मिळत आहे. 
विशेष म्हणजे ही मुलींची शाळा असून एकाही महिला शिक्षिकेची नियुक्ती येथे करण्यात आलेली नाही. सुरूवातीपासून ही पदे रिक्त असल्याची माहिती आहे. शाळेत अनेक पदे रिक्त असून महत्वाचे महिला  अधीक्षक पदही रिक्त आहे.  या मुलींची सुरक्षा महाराष्ट्र सरकार ने  वाऱ्यावर सोडली आहे.  एकीकडे सरकार बेटी पढाओ बेटी बचाओ चा  नार देत असले तरी सत्य परिस्थिती काही वेगळीच आहे.  सफाई कामगार  महिलेच्या आधाराने विद्यार्थिनी राञी झोपत असतात.  या मुलींच्या सुरक्षेला जाबबदार कोण ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.   वसतिगृहामध्ये २०१३ पासून भोजनाचे  कंत्राट स्वयंम रोजगार बहुउद्देशिय संस्था अहेरी यांना देण्यात आला होता. २०१३ ते २०१८ पर्यंत सदर संस्थेने भोजनाचे कंत्राट घेतले होते.  यावर्षी २०१९ ला नवीन कंत्राटदाराला या पोषण आहाराचा कंत्राट देण्यात आला. मात्र शाळा सुरू होऊन एका महिन्यातच पोषण आहारात अळी आढळून आल्याची तक्रार विद्यार्थिनींनी १० जुलैला मुख्याध्यापकांकडे केली.  आता विद्यार्थिनींनी शाळा सोडण्याचाच निर्णय घेतल्याने खळबळ निर्माण झाली आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-20


Related Photos