महत्वाच्या बातम्या

 पोलीस दादालोस खिडकीच्या माध्यमातून कुक्कुटपालन व भाजीपाला लागवड प्रशिक्षण घेतलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधि / गडचिरोली : जिल्ह्यातील शेतकन्यांची आर्थिक उन्नती व्हावी या उद्देशाने गडचिरोली पोलीस दादालोरा खिड़कीच्या माध्यमातून, गडचिरोली जिल्हयातील जनतेचे जीवनमान उंचावण्याच उद्देशाने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल यांचे मागदर्शनाखाली गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलग्रस्त क्षेत्रातील शेतकऱ्यांना गडचिरोली पोलीस दल व बिओआय आरसेटी गडचिरोली यांचे संयुक्त विद्यमाने कुकुटपालन व भाजीपाला लागवड प्रशिक्षण देण्यात आले होते. सदर प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणाव्यांचा निरोप समारंभ कार्यक्रम ११ नोव्हेंबर २०२२ रोजी बिओआय आरसेटी कार्यालयात पार पडला.

सदर कुक्कुटपालन व भाजीपाला लागवड प्रशिक्षण हे ०१ नोव्हेंबर २०२२ ते ११ नोव्हेंबर २०२२ पर्यंत १० दिवसांकरीता आयोजित करण्यात आले होते. कुक्कुटपालन प्रशिक्षणाकरीता २८ युवक-युवती भाजीपाला लागवड प्रशिक्षणाकरीता २८ युवक-युवतींनी सहभाग पन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केले. सदर निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी सर्व प्रशिक्षणार्थ्यांना भाजीपाला किटचे वाटप करण्यात आले व भाजीपाला लागवड प्रशिक्षण पूर्ण केलेल्या युवक-युवतींना स्प्रे पंपचे वाटप करण्यात आल.

यावेळी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी आपल्या मार्गदर्शनात गडचिरोली जिल्हयातील बेरोजगार युवक-युवती, शेतकरी व इतर जनतनी गडचिरोली पोलीस दलाच्या या उपक्रमाचा लाभ घेवुन आपले जीवनमान उंचवावे असे आवाहन केले. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील शेतकर्यांनी अत्याधुनिक शेतीचे ज्ञान घेऊन व दर्जेदार पद्धतींचा अवलंब करून व त्याबाबतची सर्व माहीती संकलीत करून आपला विकास करावा, यासाठी गडचिरोली जिल्हयातील जनतेच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असे सांगितले. तसेच नक्षलवाद्यांच्या खोट्या चळवळीला बळी न पडता गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने स्वतःचा व जिल्हयाचा विकास साधावा.

गडचिरोली पोलीस दलाच्या पुढाकाराने सुरु असलेल्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातून आतापर्यंत गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम व अतिदुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक सहलीचे आयोजन व तसेच बेरोजगार युवक-युवतींना ब्युटीपार्लर १४०, मत्स्यपालन ८७, कुक्कुटपालन ५०५, बदक पालन १०५, वराहपालन १०, शेळीपालन ८० शिवणकला २२२, मधुमक्षिका पालन ३२, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड ५२५, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण ८८०, टू व्हिलर दुरुस्ती ६४, फास्ट फुड ६५, पापड लोणचे ३५, दु/ फोर व्हिलर प्रशिक्षण ५०२, एमएससीआयटी २००, कराटे प्रशिक्षण ४८ असे एकुण ३५५४ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे. सदर निरोप समारंभ कार्यक्रमप्रसंगी पोलीस अधीक्षक, गडचिरोली नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे तसेच बीओआय स्टार आरसेटीचे संचालक, चेतन वैद्य, मेश्राम, कुनघाडकर चीओआय स्टार आरसेटी गडचिरोली हे उपस्थित होते. सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व प्रभारी अधिकारी पोस्टे / उपपोस्ट / पोमके तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी सपोनि महादेव शेलार, पोउपनि, धनंजय पाटील व अंमलदार यांनी अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos