महत्वाच्या बातम्या

 जिवती येथे क्रांतीगुरु साळवे यांची जयंती साजरी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : ३० नोव्हेंबर २०२३ ला जिवती येथे लोकशाहिर अण्णाभाऊ साठे सामाजिक प्रतिष्ठान च्या जागेवर आद्य क्रांति गुरु लहुजी साळवे यांचे २२९ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नागरिक भोजू गायकवाड, दत्ताजी तोगरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 

या जयंती समारोहाचे उद्घाटक शाहीर अंकुश मोरे अध्यक्ष संभाजी जाधव (सामाजीक कार्यकर्ता तेलंगाना) तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे मार्गदर्शक एडवोकेट दत्तराज गायकवाड (प्रदेशाध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन) डॉ. कुलभूषण मोरे (जिल्हा सचिव लसाकम चंद्रपूर), देवराव भोंगळे (माजी जी.प. अध्यक्ष), महेश देवकते (माजी उपसभापति), केशव गिरमाजी, राजाराम घोडके (तालुका अध्यक्ष लसाकम) जीवति, प्रा. बालाजी मोरे (समता दूत बार्टी) लता डकरे, प्रल्हाद मदने, भगवान डुकरे, केशव भालेराव, भूषण फूसे (बीआरएस अध्यक्ष), आशीष नामवाड उपस्थित होते. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाहीर संभाजी ढगे यांनी केले तर आभार प्रदर्शन कुंटेवाड यांनी केले. समाजातील गुणवंत विद्यार्थी नवनियुक्त कर्मचाऱ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला. या कार्यक्रमाच्या आयोजनाकरिता आंबटवार, भागवत मोरे, रवी जेवाले, कांबळे जांभळे, चंद्रकांत घोडके, व्यंकटी हरगिले आदिनी  परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos