दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री , काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचे निधन


वृत्तसंस्था /  नवी दिल्ली : दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेत्या शीला दीक्षित यांचे  वयाच्या ८१ व्या वर्षी  निधन झाले आहे.  शीला  दीक्षित गेल्या काही दिवसांपासून आजारी होत्या. आज शनिवारी  सकाळी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र दुपारच्या सुमारास त्यांचं निधन झालं. सध्या शीला दीक्षित यांच्याकडे दिल्ली काँग्रेसची जबाबदारी होती. 
सर्वाधिक काळ दिल्लीचे  मुख्यमंत्रीपद भूषवण्याचा मान दीक्षित यांच्याकडे जातो. १९९८ ते २०१३ या कालावधीत त्या दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी होत्या. गांधी कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीय नेत्या अशी त्यांची ओळख होती. दीक्षित यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात दिल्लीत अनेक विकासकामं झाली. त्यांच्याच कार्यकाळात दिल्लीत मेट्रो धावली. 

   Print


News - World | Posted : 2019-07-20


Related Photos