महत्वाच्या बातम्या

 अमित शहा ९ डिसेंबरला गडचिरोली जिल्ह्यात : चिचडोह प्रकल्पाचे लोकार्पण, रेल्वे मार्गाचे भूमिपूजन


- कोनसरीत पहिल्या टप्प्यात ४०० कोटींचा स्टील प्लॅट : १ हजार जणांना रोजगार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या व वैभवात टाकणाऱ्या भर प्रकल्पांच्या उद्‌घाटन व भूमिपूजनासाठी ९ डिसेंबरला देशाचे गृहमंत्री अमित शाह जिल्ह्यात येत आहेत. कोनसरीतील नियोजित २० हजार कोटींच्या स्टील निर्मिती प्रकल्पाच्या पहिल्या टप्यात ४०० कोटीच्या कामाचे उद्‌घाटन, चिचडोह प्रकल्पाचे लोकार्पण तसेच वहसा-गडचिरोली रेल्वेमार्गाच्या कामाचे भूमिपूजन होणार आहे.

खासदार अशोक नेते व आमदार डॉ. देवराव होळी यांनी ३० नोव्हेंबरला संयुक्त पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली, लोकसभा विस्तारक बाबूराव कोहळे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे, माजी उपनगराध्यक्ष अनिल कुनघाडकर, तालुकाध्यक्ष विलास भांडेकर, भारत खटी आदी उपस्थित होते.

यावेळी खासदार नेते म्हणाले, अमित शाह यांचा नियोजित दौरा ऑक्टोबरमध्येच होता, पण पाच राज्यांतील निवडणुकांमुळे तो पुढे ढकलला. आता ९ डिसेंबर रोजी त्यांचा दौरा निश्चित इझाला आहे. सोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे देखील राहणार आहेत. कोनसरी (ता. चामोशी) येथे लॉयड मेटल्सच्या ४०० कोटी रुपयांच्या स्टील निर्मिती प्रकल्पाचे उदघाटन अमित शाह यांच्या उपस्थित होईल. याचवेळी ३ हजार कोटींच्या स्टोन पॅलेट प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात येणार आहे. कोनसरी प्रकल्पातून प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष एक हजाराहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. 

वडसा ते गडचिरोली रेल्वेमार्गाच्या ५२ किलोमीटर च्या कामाचे भूमिपूजन ऑनलाईन  पद्धतीने होणार आहे. या रेल्वेमार्गासाठी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने प्रत्येकी निम्मा निधी दिला जाणार आहे. सद्या ३२२ कोटींच्या कामाची निविदा देखील निघाल्याचे खासदार अशोक नेते यांनी सांगितले. 

गडचिरोली-चामोर्शी -आष्टी- आदिलाबाद तसेच चामोर्शी-आष्टी आदिलाबाद-नागभिड-कांपाटेपा-चिमूर वरोरा या रेल्वेमार्गाचे भूमिपूजन देखील केले जाणार आहे.
कॉरिडॉरसाठी प्रयत्न सुरु : जिल्ह्यात लोहखनिज वाहतुकीमुळे अपघाताच्या घटना रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. लोहवाहतुकीसाठी कॉरिडॉर करण्याकरिता उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक आहेत. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लावला जाईल. लोहवाहतूक स्वत्रंत रस्त्याने झाल्यास अपघात टळतील, असे खासदार अशोक नेते यांनी म्हणाले. 

वाघ, हत्तीचा बंदोबस्त करण्याचे निर्देश : जिल्ह्यात नरभक्षक वाघ, हत्तीनी धुडगूस घातला आहे. काहींचा बळी देखील गेला आहे. या पाश्ववभूमीवर रानटी हत्तींना जिल्ह्याबाहेर हलविण्याचे तर वाघाच्या बंदोबस्त करण्याचे निर्देश वनविभागाला दिले आहेत, अशी माहिती आमदार डॉ. देवरोव होळी यांनी दिली. वन्यजीव कायद्यात काहीशी शिथिलता आणण्यासाठी लोकसभेत प्रस्ताव ठेवला असल्याचे खासदार अशोक नेते यांनी सांगितले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos