महत्वाच्या बातम्या

 १ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक एडस दिनानिमित्य विविध स्पर्धा कार्यक्रम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : महाराष्ट्र राज्य एडस नियंत्रण सोसायटी,मुंबई यांचेकडून १ डिसेबर २०२३ रोजी जागतिक एडस दिनानिमित्य जिल्हयात विविध उपक्रम राबवून व्यापक जनजागृती करुन जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचवून  तपासणीसाठी प्रोत्साहित करावयाचे आहे.

त्याअनुषंगाने जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण कक्ष डापकू जिल्हा रुग्णालय,भंडाराद्वारो १ डिसेबर २०२३ सकाळी १० वाजता महाविद्यालयीन विद्यार्थी व विद्यार्थीनी करिता रॅली एचआयव्ही एडस याविषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.या रॅलीस मान्यवराद्वारे हिरवी झेंडी दाखवून रॅलीस सुरुवात करण्यात येणार आहे.

यावर्षीची एडस दिनांची थिम  Let the Community Lead समाजाचा पुढाकार, एचआयव्ही एडसचा समूळ नाश तसेच म.रा.ए.नि.सं.अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचारी यांना प्रेरणा देण्यासाठी मोंमेंटो व प्रमाणपत्र वाटप एआरटी केंद्र, येथील नोंदणीकृत ११ ते १८ वर्ष वयोगटातील मुले व मुली सिएलएचआयव्ही करिता

१.चित्रकला किंवा रांगोळी स्पर्धा, २. कविता किंवा निबंध लेखन स्पर्धा आयोजन करुन स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना प्रथम,द्वितीय व तृतीय पारितोषिक, प्रमाणपत्र व अल्पोपहार १ ते १५ डिसेबर,२०२३ यादरम्यान विविध आरआरसी महाविद्यालयामध्ये स्पर्धा कार्यक्रम तसेच तालुकास्तरावर महाविद्यालयामध्ये आयसींटीसी समुपदेशक यांचेद्वारे एचआयव्ही एडसबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

तसेच जिल्हयातील एचआयव्ही एडस बाबत जिल्हयात मोफत एचआयव्ही तपासणी केंद्र, सर्व जिल्हा,उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय, स्तरावर-११ प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर -३३ पीपीपी स्तरावर-१३ ,कारागृह व नागरी प्रसूती केंद्र,-१ असे एकूण ५८ केंद्रात तपासणी होत असते. सन २००२ ते २००३ मध्ये सामान्य रुग्ण एचआयव्ही तपासणी -६२६ ची करण्यात आली आहे.

यानंतर १३६ एचआयव्ही संसर्गित रुग्ण निश्चित झाले यांचे प्रमाण-२१.७३ टक्के होते. आज एप्रिल ते ऑक्टोबर,२०२३ मध्ये सामान्य रुग्ण एचआयव्ही तपासणी -३१८८१ करण्यात आले असून ७२ एचआयव्ही संसर्गित रुग्ण निश्चित झाले. त्यांचे प्रमाणे -०२२ टक्के आहे.

या प्रमाण हळूहळू कमी होत आहे.तसेच गरोदर मातामध्ये सन २००३ ते २००४ मध्ये एचआयव्ही तपासणी -३१४५ ची करण्यात आली असून २३ एचआयव्ही संसर्गित व्यक्ती निश्चित झाले.याचे प्रमाण -०.७३ टक्के होते.आज एप्रिल ते ऑक्टोबर,२०२३ मध्ये एचआयव्ही तपासणी -१५००२ करण्यात आले असून ०२ एचआयव्ही संसर्गित माता निश्चित झाले.त्याचे प्रमाणे -०.०१ टक्के आहे.या प्रमाण हळूहळू कमी होत आहे.

तसेच आज सध्या भंडारा एआरटी केंद्रात नियमित एआरटी औषधोपचार घेत असलेले एकूण लाभार्थ्यांची संख्या-२७६० असून तालुकानिहाय भंडारा-७८७ साकोली-४२१ लाखनी-४३० पवनी -४४४,तुमसर-२६७ मोहाडी-१७० लाखांदूर-१४१ व इतर जिल्हयातील -३०० लाभार्थी एआरटी औषधी घेत आहेत.जिल्हयात ५८ केंद्राद्वारे एचआयव्ही एडस संदर्भात मार्गदर्शन व तपासणी करण्यात आले असून विविध कार्यक्रम करण्यात येते.

तसेच मातेकडून होणाऱ्या बाळाला एचआयव्ही एडस संसर्गापासून प्रतिबंध करणे (EMTCT बाबत मागील ५ वर्षात ५६ एचआयव्ही संसर्गित गर्भवती मातांना एआरटी औषधोपचार तात्काळ सुरु केल्यामुळे जन्माला आलेले ५६ बालकांचे १८ महिन्यानंतर एचआयव्ही तपासणी केली असता सर्व बालक एचआयव्ही निगेटिव्ह आढळून आलेले आहेत.

या १८ महिन्यात जन्म झाल्यानंतर नेव्हॅरॅपिन औषध दिल्यानंतर दीड ते तीन महिन्यानंतर सिपीटी सिरप सुरू करण्यात आले.तसेच त्यांचे वेळोवेळी डीएनए पिसीआर तपासणी करुन बाळाचे मातेला आयसीटीद्वारे नियमित समुपदेशन सेवा पुरविण्यात येत असते.

त्यामुळे असुरक्षित अतिजोखिम ठिकाणी समुपदेशन व तपासणी शिबिराचे आयोजन,कलापथके,माहिती शिक्षण व संवाद पोस्टर,पॉम्प्लेट,१०९७ टोल फ्री क्रमांक,वर्तमानपत्रामधून शास्त्रीय माहिती भिंतीचित्रे,ऑनलाईन मार्गदर्शन व विविध स्पर्धा प्रतिबंध करण्यात आले असून तसेच लोकांचे मनातील यासंदर्भातील गैरसमज दूर केले जातात. सर्व गर्भवती मातांनी आणि जास्तीत जास्त जनतेनी एचआयव्ही ची मोफत तपासणी करुन घ्यावी,असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक,जिल्हा रुग्णालय,भंडारा या विभागाकडून कळविण्यात आले आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos