डॉ. नागुलवार यांना मारहाण प्रकरणी डॉ. हटवार व वाहनचालकास कारवास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
डॉ.सौरभ नागूलवार यांना मारहाण केल्या प्रकरणी    मुख्य न्यायदंडाधिकारी  बि. एम. पाटील यांच्या न्यायालयाने आरोपी  महिला डॉ.नंदा मारोतराव हटवार (३४) रा.पंचवटीनगर गडचिरोली व वाहनचालक अमर सत्यविजय दुर्गे (३०) रा. रामनगर  गडचिरोली  या दोघांना प्रत्येकी ६ महिन्याचा कारावास व ४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.
 २३ मार्च २०१९ रोजी आरोपी डॉ. नंदा हटवार आणि  अमर दुर्गे यांनी फिर्यादी डॉ. सौरभ नागुलवार यांच्या ओंकारनगरातील घरी जावुन पैशाचे देवाण- घेवाणीच्या कारणास्तव झगडाभांडण करुन शिवीगाळ केली व हाताबुक्यांनी मारहाण केली अशी  तक्रार डॉ. सौरभ नागुलवार  यांनी  गडचिरोली पोलीस ठाण्यात केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने   आरोपी विरोधात अप. क्र. १९७/२०१९, कलम ४४८, ३२३, ५०४, ५०६, ३४ भादंवि अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार दादाजी ओल्लालवार यांनी तत्कालीन पोलीस निरिक्षक दिपरतन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले.
या प्रकरणावर आज १९ जुलै रोजी मुख्य न्यायदंडाधिकारी बि.एम. पाटील यांच्या न्यायालयाने सबळ साक्ष पुराव्या वरुन डॉ. नंदा हटवार व अमर  दुर्गे यांना प्रत्येकी ६ महिने कारावास व ४ हजार रूपये दंडाची शिक्षा सुनावली.  सरकार पक्षातर्फे सहाय्यक  सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी तसेच कोर्ट पैरवी अधिकारी यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी  काम पाहिले.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-19


Related Photos