मुल जवळ ट्रकला स्कार्पिओची धडक, पती जागीच ठार , पत्नी गंभीर जखमी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल  :
येथून ४  किमी अंतरावर असलेल्या डोनी फाट्याजवळ  उभ्या असलेल्या ट्रकला मागून स्कार्पिओने जोरदार धडक दिल्याने पती जागीच ठार तर पत्नी  गंभीर जखमी झाल्याची घटना आज १९ जुलै रोजी सकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली आहे. 
 जय नगर चामोर्शी येथील रहिवासी भावतोष शाना उपचाराकरीता सेवाग्राम  येथे स्कार्पिओ वाहनाने जात होते.  मूल शहरापासून ४ कि.मी  अंतरावर असलेल्या डोनी फाटयाजवळ १४ चाकी ट्रक क्र सि.जी. ०८  झेड ६५४५ उभा होता.  स्कार्पिओ क्र सि.जी १९ बिई ४५०० च्या चालकाने कट मारण्याच्या प्रयत्नात ट्रकच्या मागील भागास  जोरदार धडक दिल्याने चालकाच्या बाजूला बसलेले ४६ वर्षीय भावतोष शाना जागीच ठार झाले. तर त्यांची पत्नी कुसुम शाना हिला डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. सकाळला   फिरायला जाणाऱ्या  जागरूक नागरीकांनी पोलीस स्टेशन ला दुरध्वनी व्दारे माहिती दिली. जखमींना   घेवून मूल  येथील उपजिल्हा रूग्णालयता आणले असता डाॅक्टरांनी भावतोष याला मृत   घोषीत केले. प्रेत शवविच्छेदना नंतर कुटूंबाच्या स्वाधीन करण्यात आले. मूल पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुर्लीधर कासार यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॅान्स्टेबल प्रकाश खाडे, पोलीस हवालदार नुतन हे प्राथमिक तपास करीत आहे.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-19


Related Photos