राष्ट्रीय बाल हक्क आयोगा (NCPCR) मार्फत गडचिरोली येथे सुनावणीला सुरूवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
नागपुर विभागातील सर्व जिल्हयांच्या बाल हक्कांबाबत सुनावणीला आयोगाचे सदस्य डॉ. आर.जी. आनंद यांच्या अध्यक्षते खाली सुरवात झाली आहे. येथील नियोजन भवनाच्या सभागृहात सुरू झालेल्या सुनावणीसाठी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे उपस्थित होते. त्यांच्यासोबत सदस्या वासंती देशपांडे व सीमा व्यास उपस्थित आहेत. पाहूण्यांचे स्वागत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
डॉ. आनंद म्हणाले की हा भारतातील ९ वा तर महाराष्ट्रातील १ ला बेंच आहे जिथे प्रत्यक्ष जिल्हयात जाऊन बाल हक्कांबाबत सुनावणी घेतली जात आहे. नियोजनाबद्दल जिल्हाधिकारी तसेच संबंधित सर्व विभागांचे त्यांनी यावेळी आभार मानले. ते म्हणाले आम्ही अशा प्रकारे प्रत्यक्ष जाऊन विविध तक्रारी मार्गी लावण्यासाठी व सामान्य लोकांच्यात आयोगाबद्दल जनजागृती करण्यासाठी फिरत आहोत. बाल हक्कांबाबत शासन स्तरावर खुप प्रकारे तक्रारी नोंदविता येतात. परंतू त्या निकाली काढण्यासाठी वेळ लागत आहे. त्या वळेत पुर्ण करणे व संबंधितांना न्याय मिळवून देणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासना बरोबर सर्व लोकांचाही सहभाग म्हत्वाचा आहे.
 त्यानंतर महाराष्ट्र बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे म्हणाले की या प्रक्रियेमध्ये सर्व स्तरावर प्रयत्न आवश्यक असून सर्वांनी सजग होणे गरजेचे आहे. बाल हक्क व संरक्षणाबाबत सर्वांना माहिती असणे गरजेचे आहे.
 समितीचे स्वागत सकाळी ९.३० वा. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये लेझिम पथकाद्वारे झाले. त्यानंतर १० वा. आयोगाने पत्रकार परिषद घेतली. पुढे १०.३०  वा. पाहूण्यांच्या स्वागतानंतर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात करण्यात आली आहे. या जनसुनवाणीसाठी तक्रारी दाखल करण्यासाठी कार्यक्रमस्थळी मदत केंद्र सुरु करण्यात आले आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-19


Related Photos