आरमोरी येथील आझाद चौकातील कथित दगडफेकीचा महाराष्ट्र अंनिसने केला भंडाफोड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / आरमोरी :
येथील आझाद चौक या  शहराच्या  मधोमध असलेल्या  दाट आणि जुन्या वस्तीच्या भागात गेल्या ६  दिवसापासून रात्री १० ते १२ वाजताच्या दरम्यान वरून दगड, विटाचे तुकडे तसेच नागरिकाच्या घरावरही दगड पडत असल्याने व सदर चौकातील  एका घरातुन कोणीतरी हात दाखवित असल्याची चित्रफित सोशल मिडीयावर प्रसारित झाल्याने आझाद चौकातील नागरिकांमध्येच नव्हे तर संपूर्ण आरमोरीकरांच्या मनात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. अक्षरशः विद्यार्थी सुध्दा अभ्यास करतांना धास्तावले होते. या सर्व प्रकरणाचा महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी भंडाफोड केला आहे. 
मागील तिन दिवसापासून आरमोरी पोलिसांकडून  या ठिकाणी  गस्त सुरु आहे.  पोलीस निरिक्षक सुरेश चिटकावार यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बोंडसे  हे नजर ठेऊन आहेत.  परंतु रात्री पोलीस जो पर्यत राहतात तो पर्यत त्या ठिकाणी दगड पडल्याच्या घटना घडल्या नाहीत.  मात्र रस्त्याच्या बाजुला जिथे बांधकाम सुरू आहे तिथे ठेवलेले दगड आणि फेकलेले भात पुर्णपणे साम्य आढळुन आले. तसेच काही खंडर पडलेल्या घराच्या ठिकाणी ज्या विटाचे तुकडे पडलेले आहे त्या तुकडयांमध्येसुध्दा साम्य आढळुन आले. त्यामुळे याच   शेजारी भागातून काही खोडसर , टवाळकी करण्याच्या  हेतुने  दगडफेक करत होते. परंतु यामध्ये नाहक कुणाचीही वित्तहानी किंवा जिवीत हानी होऊ नये म्हणून महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मुलन समिती  जिल्हा शाखेने घटनास्थळ गाठले. प्रत्यक्ष पाहणी मध्ये हा सगळा प्रकार एखाद्या माथेफिरूने केल्या सारखा वाटला त्यातही पोलीस विभागाला काही तरूण मद्यपान करून ही दगड फेकतांना आढळले आणि ज्या घरी हात दाखविल्याचा प्रकार घडला तिथे एक कुटुंब राहत आहे व असला कुठलाही प्रकार न घडल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी महाराष्ट्र अनिसचे जिल्हाध्यक्ष उध्दव डांगे यांनी हा प्रकार गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे ठासून सांगितले.  यावेळी अनिसच्या वतीने अज्ञान दुर कर आवाजचा जयघोष करून असल्या भुलथापावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.  यावेळी कोषाध्यक्ष विठ्ठलराव कोठारे, गोविंदराव ब्राम्हणवाडे, सुधाकर दुधबावरे, अमोल मारकवार, दिपक गोंदोळे, महेश कोपुलवार, लहुजी रामटेके, सिमा निखारे, पोलीस विभागाचे कर्मचारी आझाद चैकातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-18


Related Photos