पोर नदीपात्रात आढळले युवतीचे प्रेत, हत्या करण्यात आल्याचा संशय


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
पोटेगाव पोलिस मदत केंद्राच्या हद्दीतील कुथेगाव जवळील पोर नदीपात्रात अविवाहीत युवतीचे प्रेत आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली आहे. 
चंद्रप्रभा देवराव अप्पलवार (३२) रा. कारवाफा असे मृतक युवतीचे नाव आहे. तिची प्रेमसंबंधातून हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त केली जात असून परिसरात तशी चर्चाही आहे. गडचिरोली पोलिसांनी मर्ग दाखल केला आहे. चंद्रप्रभा ही जि.प. च्या ग्रामीण विकास यंत्रणा विभागात लिपीक पदावर चामोर्शी येथे कार्यरत होती अशी माहिती प्राप्त झाली आहे. घटनास्थळापासून काही अंतरावर तिची एमएच ३३ यु १६०७ क्रमांकाची दुचाकी आढळून आली आहे. घटनेचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-07-18






Related Photos