पोलिस कर्मचारी मिथून रासेकर याच्यावर गुन्हा दाखल


- पोलिस विभागाची माहिती
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
सी - ६० पथकातील पोलिस जवान मिथून रासेकर याने १५ जुलै रोजी नळावर पाणी भरत असलेल्या महिलेकडे पाहून अश्लिल शब्दोपचार केल्याबद्दल गडचिरोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस विभागाकडून देण्यात आली आहे.
१५ जुलै रोजी रासेकर याने महिलेला पाहून अश्लिल इशारा केल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. यानंतर रासेकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कायदा सर्वांसाठी समान असून त्याची अंमलबजावणी करण्यास गडचिरोली पोलिस कटिबध्द आहे. गुन्ह्याचा तपास गडचिरोली पोलिस करीत आहेत, अशी माहिती पोलिस विभागाडून देण्यात आली आहे.

 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-07-18






Related Photos