विनयभंग, गुंडागर्दी करणाऱ्या सी - ६० जवानाला वाचविण्याचा पोलिस विभागाचा प्रयत्न


- we 4 change  चेंज संघटनेचा आरोप
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
येथील एका सिमेंट ब्रिक्स कंपनीत कामावर असलेल्या कामगार महिलेचा विनयभंग करणाऱ्या  व गुंडागर्दी करणाऱ्या  सी - ६०  जवानाला वाचविण्याचा प्रयत्न पोलिस विभाग करीत असल्याचा आरोप we 4 change  या संघटनेने प्रसिध्दी पत्रकातून केला आहे.
मिथून रासेकर असे सी - ६०  जवानाचे नाव असून या जवानामुळे शिस्तबध्द पोलिस दलाची प्रतिमा मलीन होत असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. त्याला पाठीशी न घालता कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सी - ६०  जवान मिथून रासेकर याने १५  जुलै रोजी मलिक बुधवानी यांच्या श्री साई सिमेंट ब्रिक्स कारखान्यात काम करणाी महिला नळावर पाणी भरत असताना तिच्याजवळ येवून तिच्याकडे शारीरीक सुखाची मागणी केली. पिडीत महिला त्याला ओळखत नव्हती. यावेळी महिला जवळ  कोणीही नसल्याने धावत मालकाच्या कार्यालयात गेली. बुधवानी यांनी काही कामगारांसह बाहेर येउन मिथून रासेकर याला समजाविण्याचा प्रयत्न केला. तेव्हा रासेकर याने मी पोलिस आहे, एस.पी. चा माणूस आहे, तुम्ही माझे काहीही बिघडवू शकत नाही, तुम्हाला काय करायचे ते करून घ्या, असे धमकावू लागला. यावेळी बुधवानी यांनी पोलिसांना बोलाविले. पोलिस ताब्यात घेत असल्याचे बघून मिथून रासेकर घाबरला. त्याने पिडीत महिलेला माफ कर, तुला एक लाख रूपये देतो, असे म्हणू लागला. पोलिस घटनास्थळी आले, महिलेचे बयाण नोंदविले. मिथून रासेकर याच्यावर ५०९  हे सौम्य कलम लावले. रासेकरला अटक करण्यात आली नाही किंवा त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. यामुळे पोलिस त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत. रासेकर ऐवजी कोणी सामान्य नागरीकाने गुन्हा केला असता तर पोलिसांनी कडक कारवाई केली असती, असे संघटनेने म्हटले आहे. 
मिथून रासेकर याच्यावर भादंवि ३५४  , ४४१ , ५०३  कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात यावा, त्याला त्वरीत अटक करण्यात यावी, अशी मागणी संघटनेच्या प्रा. रश्मी पारसकर, प्रा. दीपाली मेश्राम, डाॅ. चित्रा तूर, सुनयना अजात यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-18


Related Photos