वेडसर महिलेवर बलात्कार, आरोपीस अटक


- धानोरा तालुक्यातील घटना
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
धानोरा तालुक्यातील राजोली येथे एका वेडसर महिलेवर इसमाने बलात्कार केल्याची घटना १६ जुलै रोजी उघडकीस आली असून आरोपी लालाजी तुळशिराम निकेसर (४९) रा. राजोली ता. धानोरा याला अटक करण्यात आली आहे.
पिडीत वेडसर महिला हेटी येथील रहिवासी आहे. आरोपी मिस्त्री काम करतो. आरोपीने काही दिवसाआधी पिडीत महिलेच्या नातेवाईकाच्या घरी घर बांधकाम करीत होता. यामुळे तो तिला ओळखत होता. वेडसर महिला १६ जुलै रोजी गडचिरोली - धानोरा मार्गावरील कन्हारटोला गावाजवळ आरोपीला दिसली. यावेळी आरोपीने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेत रस्त्याच्या बाजूला शेतात नेत तिच्यावर बलात्कार केला. ही घटना पिडीतेच्या भावाला माहित होताच  पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विसराज शिवपुजे करीत आहेत. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-18


Related Photos