महत्वाच्या बातम्या

 स्थानिक कलाकारांकडून संस्कृतीची जोपासना : भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांचे प्रतिपादन


- जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते घारगांव येथील आयोजित बहीण लाडाची वहिनी का काळाची दंडारी चा उद्धघाटन संपन्न.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधि / गडचिरोली : कार्तिकेच्या शुभ मुहूर्तावर हनुमान मंदिराच्या मदती करिता पंचकला महिला दंडार मंडळ मालेझरी च्या वतीने घारगाव येथे बहीण लाडाची वहिनी काळाची अर्थात भाषाचा खून दंडारीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी उद्घाटन स्थानावरून संबोधित करताना बोलले की, गावा-गावात मंडई चे आयोजन होणार असताना दंडारी च्या माध्यमातून स्थानिक कलाकारांचे पडदे उघडणार आहेत. विशेष म्हणजे, कलासंस्कृतीची जोपासना केली जात असून आता युवावर्गही यात पुढे येत असल्याचे दिसून येत आहे. गडचिरोली जिल्हा हा झाडीपट्टी ही कलावंताची खाण आहे. या खाणीत अनेक कलावंत निपजत आहेत. त्यामुळेच झाडीपट्टीतील संस्कृतीचे दर्शन कलावंताच्या माध्यमातून पुढे आणण्याचे काम केले जाते. दिवाळी उत्सवा निमित्य प्रत्येक गावात दंडार, नाटक, लावणी, खडीगम्मत अशा कार्यक्रमांचे आयोजनसुध्दा केले जाते.

या माध्यमातून अनेक कलावंत पुढे येत असतात व मंचाच्या माध्यमातून आपली कलाकृती सादर करून लौकीक मिळवित असतात. विशेषतः याच माध्यमातून काही कलावंतांना हिंदी, मराठी चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली आहे. त्यांच्या कलेतून झाडीपट्टीचा मान वाढविण्याचे एक चांगले कार्य घडून येत आहे. दिवसा मनोरंजनात्मक कार्यक्रम तर रात्रीच्या वेळीसुध्दा गावातील हौसी मंडळ, युवक मंडळाच्या वतीने नाटक, दंडार आदींचे आयोजन केले जात आहे. त्याच्यामुळे स्थानिक कलाकारांकडून संस्कृतीची जोपासना होत आहे. आणि ही जोपासना समाजासाठी व समाजाला समोर नेण्याकरिता अत्यंत महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांत वाघरे यांनी केले.

यावेळी मंचावर स्पंदन फाउंडेशन तथा स्पंदन हॉस्पिटल डॉ. मिलिंद नरोटे, अतुलजी गण्यारपवार जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, स्वप्नील वरघंटे जिल्हा उपाध्यक्ष भाजपा, नरेश जूवारे, गुरुदास चौधरी प्रमोद भगत, कबीर आभारी उपसरपंच तथा अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, विवेक भगत सरपंच घारगाव, ढेमा आभारी पोलीस पाटील घारगाव, योगराज आभारे अध्यक्ष तंटामुक्ती, खेमदेव आभारे, संदीप आभारे व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos