मातेनेच केली 'त्या' चिमुरडीची हत्या , कारण धक्कादायक!


वृत्तसंस्था / नाशिक :  शहरात एका १४ महिन्यांच्या चिमुरडीच्या हत्येला धक्कादायक वळण मिळाले आहे.  जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. योगिता पवार असे निर्दयी आईचे नाव आहे. स्वराच्या रडण्याचा योगिता हिला कंटाळा आला होता. त्यामुळे तिने स्वराचा गळा आवळला. मुलीची हत्या केल्यानंतर तिने स्वतःच्या हातावर जखमा केल्या. अनोळखी व्यक्तीने घरात घुसून स्वराची हत्या केल्याचा बनावही तिने केला होता. उच्चभ्रू कुटुंबातील या घटनेने   खळबळ उडाली आहे.  
शहरातील औरंगाबाद महामार्गावरील पॅराडाईज अपार्टमेंटमधील मुकेश पवार यांची १४ महिन्यांची चिमुरडी स्वरा हिला अत्यंत जखमी अवस्थेत पंचवटीतील निमाणी परिसरातील येथील एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तिला तपासल्यानंतर मृत घोषित केले होते. पोलिसांनी स्वराच्या मृत्युबाबत घातपाताचा संशय व्यक्त केला होता. घरी असलेली स्वराची आईसुद्धा जखमी असल्याची माहिती कुटुंबीयांनी पोलिसांना दिली होती. ही घटना घडली तेव्हा मुकेश पवार हे ड्युटीवर गेले होते.  अनोळखी व्यक्तीने घरात घुसून स्वराची हत्या केली तसेच माझ्यावरही वार केले असा, बनाव मारेकरी योगिताने केला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत योगिताने परस्परविरोधी माहिती दिल्याने तिच्यावरच अधिक संशय बळावला होता. तिच्या हातावरच्या जखमा देखील किरकोळ असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले होते.
अवघ्या १४ महिन्यांच्या स्वराच्या रडण्याचा जन्मदात्या योगिताला कंटाळा आला होता. त्यामुळे तिने स्वराचा गळा घोटला. मुलीची हत्या केल्यानंतर तिने स्वतःच्या हातावर जखमा केल्या. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तिच्यावर उपचार सुरू होते. पोलिसांनी मारेकरी आईला अटक केली आहे. मानसिक अस्वस्थतेतून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-17


Related Photos