महत्वाच्या बातम्या

 शालेय पोषण आहारात विद्यार्थ्यांना आता मिळणार केळी आणि अंडी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात पालिकेच्या आणि पालिकेकडून अनुदान मिळणाऱ्या खासगी संस्थांच्या अशा मिळून तब्बल १ हजार ९३९ शाळांमध्ये शालेय पोषण आहार योजना राबविली जात आहे. इस्कॉनसह सुमारे १६० महिला मंडळे पालिकेकरिता ही योजना राबवितात.

खिचडी, पुलाव, वरणभात, आमटीभात हे पदार्थ मुलांना भोजनात दिले जातात. पूरक आहारासाठी वेगळे अनुदान नसल्याने ते बंद होते. मात्र, आता अंडे किंवा केळी यासाठी वेगळे अनुदान दिले जाणार आहे. मुलांना त्यांच्या आवडीनुसार यापैकी एक पोषण आहारासह दिले जाणार आहे. त्यामुळे मुलांना याचा आस्वाद घेता येणार आहे.

क जीवनसत्त्व असलेल्या भाज्या मिळणार :
मुगाची खिचडी, आमटी (हरभरा किंवा मटकी किंवा चवळी) व भात, वरण (मूग किंवा तूर डाळ) व भात, मसालेभात किंवा पुलाव (क जीवनसत्त्व असलेल्या भाज्या, वाटाणा), आमटी (हरभरा किंवामटकी किंवा चवळी) व भात, वरण (मूग किंवा तूर डाळ) व भात यांचा समावेश.
या योजनेवर दरमहा ५.२१ कोटी खर्च होतो. मुंबईत शालेय पोषण आहार देणाऱ्या महिला बचत गटांचे अनुदान थकले होते.

पोषण आहारात आता अंडी-केळी :
दिवाळीच्या सुटीनंतर आठवड्यातील एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, अंडा बिर्याणी, पुलाव व मांसाहार न करणाऱ्या विद्यार्थ्यांना केळी व अन्य स्थानिक फळे मिळणार आहेत. प्रतिविद्यार्थी पाच रुपयांप्रमाणे हा खर्च केला जाणार आहे. या योजनेत जिल्हा पालिकेसह खासगी अनुदानित शाळांचा समावेश आहे.





  Print






News - Rajy




Related Photos