दुचाकी चोरटे पोलिसांच्या जाळ्यात, चार दुचाकी जप्त


- स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
चोरलेली मोटारसायकल विक्रीच्या उद्देशाने फिरत असलेल्या चोरट्यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून अटक केली आहे. रोशन गंगाधर अवताळे (२०)  व तेजस सुनिल राउत (१९)  दोघेही रा. लहुजी नगर एमआयडीसी चंद्रपूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
आरोपी १६  जुलै रोजी रामनगर वार्डात एक दुचाकी घेवून विक्री करण्यासाठी फिरत होते. ही माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखा पथकाने दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशी  केली असता दुचाकी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. दोघांचीही कसून चौकशी  केली असता यापूर्वी रामनगर, दुर्गापूर, पडोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतून आणखी ३ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींकडून एमएच ३४  एसी २७४८ , एमएच ३४  एक्स ०४२२ , एमएच ३४  एसी २७४८  सह अन्य एक अशा चार दुचाकी जप्त करण्यात आल्या. सदर कारवाई पोलिस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा पथकाचे प्रभारी पोलिस निरीक्षक ओ.जी. कोकाटे यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मानकर, सहाय्यक फौजदार पंडीत, पोलिस हवालदार केमेकर, करकाडे, पोलिस नाईक संजय, पोलिस शिपाई अमोल, रवि, गोपाल, अनुप, प्रितम, प्रशांत नागोसे यांनी केली आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-17


Related Photos