चार हजारांची लाच स्वीकारल्याने पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया:
कलम ३२४ , ३४  भादंवि अन्वये दाखल गुन्ह्यात अटक न करण्यासाठी पाच हजारांची लाच मागून ४ हजारांची  लाच स्वीकारल्याप्रकरणी गोंदिया शहर पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे.
हिरादास सुखदेव पिलारे (४७)  असे लाचखोर पोलिस हवालदाराचे नाव आहे. तक्रारदार गोंदिया येथील रहिवासी असून मजुरीचे काम करतो. त्याचा मुलगा आणि अन्य दोघांविरूध्द गोंदिया शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याबाबत विचारपूस करण्यासाठी तक्रारदार पोलिस हवालदार पिलारे याला भेटला. यावेळी तुझ्या मुलास गुन्ह्यात अटक करायची आहे. अटक न करण्यासाठी ५ हजार द्यावे लागतील असे सांगितले. याबाबत १५  जुलै रोजी एसीबीकडे तक्रार दाखल करण्यात आली. एसीबीच्या अधिकाऱ्यांनी  शहनिशा करून आज १७  जुलै रोजी सापळा रचला. गोंदिया शहर पोलिस ठाण्यात तडजोडीअंती ४ हजारांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली. गोंदिया शहर पोलिस ठाण्यात कलम ७ लाचलुचपत प्रतिबंधक कायदा १९८८  (सुधारित अधिनियम २०१८)  अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
सदर कारवाई पोलिस उपअधीक्षक रश्मी नांदेडकर, अपर पोलिस अधीक्षक राजेश दुद्दलवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपअधीक्षक रमाकांत कोकाटे, पोलिस निरीक्षक शशिकांत पाटील, नापोशि रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेंद्र बिसेन, महिला पोलिस शिपाई गिता खोब्रागडे, वंदना बिसेन, चालक शिपाई देवानंद मारबते यांनी केली आहे.

   Print


News - Gondia | Posted : 2019-07-17


Related Photos