खमारी येथील अनुसूचित जातीतील नागरिकांचा भाजप मध्ये प्रवेश


- भाजप हा सर्वसामावेशी पक्ष : विनोद अग्रवाल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गोंदिया : संकल्प से सिद्धी चा मंत्र पूर्णत्वास नेत सर्वसामावेशी भाजप आता समाजाच्या प्रत्येक नागरिकाला पक्षासोबत जोडण्याचे कार्य करीत असून भारतीय जनता पक्षाच्या सदस्य नोंदणी मोहीमेला उत्स्फूर्त प्रतिसाद जनतेकडून मिळत आहेत. त्यालाच जोड म्हणून ग्राम खमारी येथील अनुसूचित जातीतील जनतेचा भाजप प्रवेश गोंदिया परिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्तिथीत पार पडला.
यावेळी प्रामुख्याने माजी ग्रामपंचायत सदस्य शेखर वाढवे, संजय बोरकर, मनोहर साखरे (अनुसूचित जाती मोर्चा) उपस्थित होते. दरम्यान भाजपचा झेंडा हाती देत व पक्षाचा शेला देऊन भारतीय जनता पक्षात सर्वांचे स्वागत करण्यात आले.
प्रवेश घेणाऱ्यांमध्ये प्रामुख्याने सुनील साखरे, दिनेश साखरे, निकेश इंदूरकर, सुजित राऊत, सुनिल मेंढे, सचिन इंदूरकर, दुर्गेश इंदूरकर, सपनाताई साखरे, आशाताई इंदूरकर, निर्मलाताई साखरे, सुदेश राऊत, दुर्गेश बनसोड, आम्रपालीताई रणजित डहाट, दुर्गाबाई दुर्गेश वाढई आणि रवी नागराज तरोणे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतला.
News - Gondia | Posted : 2019-07-17