महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रीय मानवाधिकार संघटना तर्फे सन्मान सोहळा 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / अहेरी : २६ नोव्हेंबर २०२३ अहेरी प्राणहिता पोलीस उपनिरीक्षक, गौतम साळवे यांच्या हस्ते तालुका कार्यकारणी व पदाधिकारी यांना प्रमाणपत्र, नियुक्तीपत्र तसेच ओळखपत्र वितरित करण्यात आहे. 

यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ अध्यक्ष जावेद अली, जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर यांच्या प्रमुख उपस्थिती तालुका अध्यक्ष व तालुका उपाध्यक्ष यांना प्रमाणपत्र व ओडखपत्र देऊन सन्मान करण्यात आले. 

यावेळी तालुका अध्यक्ष राजेंद्र चिमडालवार, तालुका महिला उपाध्यक्ष इंदिरा दुधे, तालुका उपाध्यक्ष प्रशांत जोशी, तालुका उपाध्यक्ष महिला मनीषा आलाम, तालुका सदस्य सुरेश देवराव अलोने, अजय नानाजी ठाकरे, जिल्हा विधिक सल्लागार ज्योती ईश्वर डोके, जिल्हा सल्लागार रिजवान शेख, रमा राजेंद्र चिमरालवार, जोत्स्ना शंभरकर, अस्वनी चिमरालवार प्रमुख उपस्थित होते.

यावेळी विदर्भ अध्यक्ष जावेद अली यांनी मार्गदर्शनात म्हणाले कि, गोर गरीब जनतेच्या नेहमी मदतीला जाऊन ज्या काही समस्या असतील ते तत्परतेणे सोडविण्यासाठी कटीबद्द रहावे असे म्हणाले. 

प्रमुख पाहुणे उप पोलीस उपनिरीक्षक साळवे यांनी मार्गदर्शनात म्हणाले कि, मानवाधिकार संघटना ही अतिशय महत्वाची संघटन असून अन्याय अत्याचार करणाऱ्या विरोधात नेहमी आवाज उचलून सरकारची व जनतेची मदत करीत असते. असेल बोलून महत्वाचे मार्गदर्शन केले.

राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष किशोर शंभरकर यांनी बोलताना म्हणाले कि, मागील अनेक दिवसापासून जनतेच्या हिताचे कामे केली जात आहे. गडचिरोली जिल्यातील रोड वरील खडयामुडे होणारा त्रास असेल उपजिल्हा रुंगाल्यातील समस्या असेल किंवा गाव खेड्यातील समस्या असेल असेल अनेक समस्या संघटन द्वारा उचलून जनतेला न्याय मिळवून दिले आणि आपणही अश्याच प्रकारचे कार्य करावे. 

यावेळी मोट्या संखेत पद्धधिकारी उपस्थिती होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos