टॅक्स रिटर्न फाईल्स भरतांना आधार नंबरमध्ये चूक झाल्यास १० हजारांचा दंड


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / नवी दिल्ली :
टॅक्स रिटर्न फाईल्स वा अन्य सरकारी कागदपत्रांमध्ये आधार कार्ड नंबर नोंदवताना चूक झाल्यास ती चांगलीच महागात पडणार आहे. सरकार लवकरच ’इन्कम टॅक्स ऍक्ट’शी संबंधित नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱयाकडून १०  हजारांचा दंड वसूल केला जाणार आहे. प्राप्तीकराशी संबंधित नियमावलीत बदल अंमलात आल्यानंतर नागरिकांना डोळ्यात तेल घालून सरकारी कागदपत्रांमध्ये आधार नंबर नोंदवावा लागणार आहे. ’इन्कम टॅक्स ऍक्ट’च्या कलम २७२ अन्वये हा बदल केला जाणार आहे. विशेष म्हणजे, चुकीचा आधार नंबर नोंदवणाऱया व्यक्तीबरोबरच त्या नंबरची पडताळणी करणाऱया सरकारी अधिकाऱयालाही हा दंड ठोठावला जाणार आहे. कराचा भार टाळण्यासाठी नागरिकांनी चुकीचा आधार नंबर नोंदवू नये, यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे.

   Print


News - World | Posted : 2019-07-17


Related Photos