बँक ऑफ बडोदा ( विजया बँक ) च्या ११२ व्या स्थापना दिनी २० जुलै ला रक्तदान शिबिर


- रक्तदात्यांना सहभागी होण्याचे आवाहन
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
बँक ऑफ बडोदा ( विजया बँक ) च्या ११२ व्या स्थापना दिनानिमित्त २० जुलै रोजी बँकेच्या गडचिरोली शाखेत भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
सकाळी १० ते दुपारी ३ वाजता पर्यंत शिबिर राहणार आहे. तरी जास्तीत जास्त रक्तदात्यांनी शिबिरात सहभागी होऊन रक्तदान करावे असे आवाहन शाखा व्यवस्थापक राहुल ठाकूर, रितेश शाहू यांनी केले आहे. बँक ऑफ बडोदा च्या वतीने वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ग्राहक हितासोबत सामाजिक हित जोपासत बँकेची ११३ व्या वर्षात वाटचाल सुरू आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-17


Related Photos