महत्वाच्या बातम्या

 प्रकल्पस्तरीय क्रीडा संमेलनाचे थाटात उद्घाटन


- आदिवासी विकास विभाग : ३९ आश्रमशाळांच्या खेळाडूंचा विविध स्पर्धेत सहभाग 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत गडचिरोली प्रकल्प स्तरीय तीन दिवसीय क्रीडा संमेलनाचे उद्घाटन येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या प्रशिक्षण केंद्राच्या मैदानावर शनिवार, २५ नोव्हेंबर रोजी थाटात पार पडले.
क्रीडाज्योत प्रज्वलित करून प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून सहायक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार, अनिल सोमनकर, डॉ.प्रभू सादमवार, सुधाकर गौरकर, सहाय्यक संशोधन अधिकारी गजानन बादलमवार, गडचिरोली पंचायत समितीचे माजी सभापती मारोतराव इचोडकर, प्राचार्य समशेरखान पठाण, श्री गुरुदेव जंगल कामगार सहकारी संस्था जोगीसाखराचे अध्यक्ष दिलीप घोडाम, सचिव गिरीधर नेवारे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, मुख्याध्यापक विजय देवतळे, अजय बलगुजर, आदिवासी विकास निरीक्षक वासुदेव उसेंडी, रवी आत्राम, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, क्रीडा समन्वयिका प्रमिला दहागावकर, गणेश पराते, प्रकाश अक्यमवार,पी.पी.कोरंडे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी उद्घाटक म्हणून बोलताना विकास राचेलवार म्हणाले, आदिवासी खेळाडू क्रीडा कलागुणांनी निपुण आहेत. खेळासोबतच शिक्षणाकडे लक्ष देऊन नीट, जेईई व स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवावे. भरपूर पुस्तकांचे वाचन करावे. शिक्षकांच्या मार्गदर्शनात विद्यार्थ्यांनी चांगल्या सवयी लावून घ्याव्या व आपल्या पायावर उभे राहण्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून मोठे ध्येय गाठावे. आश्रम शाळेतून आदिवासी विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी व आदिवासी समाजाला प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी सर्व शिक्षकांनी आपले कौशल्य दाखवून प्रयत्न करावे. शिक्षकांनी आदिवासी समाजाप्रती मनात सहसंवेदना ठेवावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

कार्यक्रम दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेतील मुला मुलीने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. १९ वर्षीय मुलांचा व्हॉलीबॉलचा उद्घाटनीय सामना कोरची व अंगारा या बिट संघादरम्यान झाला. यात कोरची संघ विजय ठरला.

संमेलनात करवाफा, भडभिडी, सोडे, अंगारा, कोरची या पाच बिटातील २४ शासकीय तर १५ अनुदानित अशा एकूण ३९ आश्रमशाळेतील अकराशे खेळाडूंचा सहभाग आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात सांघिक व वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे. या स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण प्रदर्शित होणार आहे.

सहभागी खेळाडूंना माध्यमिक शिक्षक नाजूक रुखमोडे यांनी तर पंचांना प्राथमिक शिक्षक बळीराम जायभाये यांनी शपथ दिली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ.प्रभू सादमवार यांनी केले. संचालन कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी संतोष कन्नाके तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी केले. वृत्तलेखन प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पाचही बिटातील क्रीडा निरीक्षक आशिष ढबाले, नागनाथ पवार, मोहन मारबते, जयप्रकाश गायकवाड, निलय गडे, पुरुषोत्तम बखर, सुभाष लांडे, रविकांत पिपरे, अशोक परतेकी, आनंद बहिरेवार आदींसह क्रीडा शिक्षक, विविध समितीचे कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास कर्मचारी, विद्यार्थी व नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos