महत्वाच्या बातम्या

 जिंकणे किंवा हरणे महत्वाचे नाही सहभाग आवश्यक आहे : भाग्यश्री आत्राम 


- अध्यक्षा भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : खरं तर कोणताही खेळ हा आनंद वाटावा आणि थोडी शारीरिक कसरत व्हावी म्हणून खेळायचा असतो. पण आपण त्याला प्रमाणपत्राची जोड लावून दिली. जिंकला तरच समाजात किंमत असेल, हरणाऱ्याला कुणी विचारत नाही. असं काहीसं आपण ऐकत आलोय. त्यामुळे आपण जगण्यातली मजा अनुभवायला च पार विसरून गेलोय. कोणतही खेळ घेतला तर त्यात एकच जिंकणारा असतो, हेच सत्य आहे. मग अशा ठिकाणी चिंता करण्याचं काय कारण ? म्हणून जिंकणे आणि हरणे ह्या पलीकडचा आपल्याला विचार करायला हवा आणि तो म्हणजे सहभागी होण्याचा.कुणीही जिंकला तरी काही हरकत नाही आपल्याला त्यात सहभाग घेतल्याचा आनंद लुटता आला पाहिजे. एवढाच नाही तर काही लोकं आयुष्याला खूपच गंभीरपणे घेतात, ते आयुष्याचे विविध रंग अनुभव घेण्यास चक्क नकार देतात. आयुष्य हे खूपच मौल्यवान आहे तर ते असं गंभीरपणे, चिंतेमध्ये, जिंकण्या- हरण्याच्या स्पर्धेमध्ये व्यर्थ न घालवता,  त्याहि पलीकडे जाऊन प्रत्येक ठिकाणी सहभाग घेऊन आनंद लुटण्याचा प्रयत्न करावा कारण सहभाग घेणे म्हणजेच शिकणे होय.

१७ व्या सैनीकोत्सव मधील क्रीडा स्पर्धेत समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी च्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम हलगेकर बोलत होत्या. त्या पुढे म्हणाल्या कि गोंडवाना सैनिकी विद्यालय नेहमीच क्रीडा क्षेत्रात अव्वल असते यात शंका नाही.

बऱ्याच स्पर्धेत इथला विद्यार्थी हा अव्वल असतो त्यांनी आता राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय स्पर्धेपर्यंत सुद्धा मजल मारून देशाचे नाव लौकिक करावे अशी आशा व्यक्त केली.

गोंडवाना सैनिकी विद्यालय गडचिरोली येथे १७ व्या सैनीकोत्सव मधील क्रीडा स्पर्धेचे  समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्था अहेरी च्या अध्यक्षा भाग्यश्री आत्राम हलगेकर ह्या होत्या तर प्रमुख अतिथी व बक्षीस वितरक म्हणून गडचिरोली चे माध्यमिक शिक्षणाधिकारी वैभव बारेकर जि.प. गडचिरोली हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यालयाचे प्राचार्य संजीव गोसावी, मित्र माती फाऊन्डेशन चे डायरेक्टर अंकुश गांगरेड्डीवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे जिल्हाध्यक्ष लीलाधर भरडकर, दंत चिकित्सक डॉ.साई खरे, उपप्राचार्य ओमप्रकाश संग्रामे, पर्यवेक्षक अजय वानखेडे, क्रीडा प्रशिक्षक भूपेंद्र चौधरी, विद्यालय नायक हर्ष उके. हे प्रामुख्याने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते बल व बुद्धीचे देवता बजरंगबली यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर चार दिवस चाललेल्या क्रीडा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. दरम्यान तंदुरुस्त आणि मानसिकदृष्ट्या सक्रिय राहण्यासाठी, विविध शारीरिक खेळामध्ये भाग घेणे महत्वाचे आहे जे शरीराला निरोगी आणि भविष्यातील संकटांना सामना करण्यास सक्रिय ठेवण्यास मदत करेल. खेळ हे केवळ मनोरंजनाचे साधन नाही तर आपले करिअर करण्यासाठी देखील महत्त्वाचे आहे. खेळ खेळाडूला चांगला खेळ दाखवणासाठी आपली बुद्धी कशी वापरावी हे शिकण्यास मदत करते. हे टीमवर्क, समन्वय, विश्वास, नियोजन शिकवते आणि शरीराला तंदुरुस्त आणि सक्रिय ठेवण्यास मदत करते. जो व्यक्ती क्रीडा क्रियाकलापांमध्ये सामील आहे त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ खूप चांगल्या पद्धतीने होते. खेळांमध्ये भाग घेणे केवळ शारीरिक विकासासाठीच नव्हे तर मानसिक वाढीसाठी देखील महत्त्वाचे आहे. खेळ हे जीवनातल्या कठीण प्रसंगांना सामोरे जाण्याचे कौशल्य शिकवतात. यात सहभाग आणि प्रयत्न करण्याचे महत्त्व देखील शिकवले जाते. खेळामुळे तणाव देखील कमी होतो. हे रक्ताचा प्रवाह वाढवण्यास मदत करते आणि आरोग्याच्या समस्या दूर ठेवण्यास मदत करते.

ऑलिम्पिक, आशियाई खेळ आणि इतर विविध कार्यक्रम हे खेळाच्या मोठ्या मोठ्या कार्यक्रमाची उदाहरणे आहेत. याच कारणामुळे, शिक्षण व्यवस्थेनेही शालेय अभ्यासक्रमात खेळांना योग्य महत्त्व द्यायला सुरुवात केली आहे. क्रीडा सुविधा आज खूप विकसित झाल्या आहेत. अगदी सरकार आणि इतर विविध संस्था त्यांना खेळाचे महत्त्व शिकवण्यासाठी जनतेपर्यंत पोहोचण्याचा खूप प्रयत्न करत आहेत असे मत गडचिरोली चे माध्यमिक शिक्षणाधिकारी वैभव बारेकर यांनी केले चार दिवसीय क्रीडा स्पर्धेत चारही हाऊसने सहभाग नोंदविला होता यामध्ये कब्बडी खोखो व्हॉलीबॉल बास्केटबॉल हँडबॉल रस्साखेच रिले इत्यादी सांघिक खेळ तर रनींग, कॅरम, लांब उडी, उंच उडी, रायफल शूटिंग, चेस, थाळी फेक, गोळा फेक, भाला फेक, कराटे, इत्यादी वयक्तिक खेळ खेळल्या गेले. संपूर्ण स्पर्धे मधून सुभाषचंद्र बोस हाऊस चा वर्ग ११ वि चा कॅडेट मास्टर रितेश भाकरे हा ऑल राउंडर खेळाडू म्हणून निवडल्या गेला, त्याचा मान्यवरांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. प्रसंगी उत्तम कामगिरी करणाऱ्या क्रीडा मार्दर्शकांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला. 

कार्यक्रमाच्या शेवटी क्रीडा ध्वज अवतरण करून क्रीडा ज्योत मालविण्यात आली. संपूर्ण कार्यक्रमाचे संचालन रहीम पटेल यांनी केले प्रास्ताविक वाचन ओमप्रकाश संग्रामे यांनी केले यार आभार गणेश बावनकुळे यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos