चंद्रकांत पाटील भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / मुंबई :
राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांची भाजप प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे. तर आमदार मंगलप्रभात लोढा यांची भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. भाजपने अधिकृत पत्रक काढून याबाबतची घोषण केली. त्यामुळे रावसाहेब दानवेंऐवजी आता चंद्रकांत पाटील राज्याचे भाजप अध्यक्ष असतील, तर आशिष शेलार यांच्या जागी मुंबई अध्यक्षपदाचा कारभार मंगलप्रभात लोढा हे सांभाळतील.
भाजप खासदार रावसाहेब दानवे यांनी आजच प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. मोदींच्या मंत्रिमंडळात रावसाहेब दानवेंकडे राज्यमंत्रिपदाचा भार आहे. ते ग्राहक संरक्षण आणि अन्न व नागरी पुरवठा राज्यमंत्री आहेत.  तर देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांच्याकडे शालेय शिक्षणमंत्रीपद सोपवण्यात आलं. त्यामुळे शेलार यांच्या जागी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद देण्यात आलं.
रावसाहेब दानवे यांचा २०१४ मध्येही मोदींच्या मंत्रिमंडळात समावेश होता. मात्र त्यांना महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षाची धुरा दिल्याने त्यावेळी मंत्रिपद सोडावं लागलं होतं. आता पुन्हा दानवेंची मंत्रिमंडळात वर्णी लागल्याने भाजपच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती.
दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. या शर्यतीत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचं नाव आघाडीवर होतं.  भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांनाही महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षपदी चंद्रकांत पाटील यांनाच पसंती होती. अखेर त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब झालं.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-16


Related Photos