बुलढाण्यात कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू, एक मुलगी अत्यवस्थ


वृत्तसंस्था / बुलढाणा :  कारमध्ये गुदमरुन दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना  घडली आहे. पाच वर्षीय मुलीची प्रकृती गंभीर आहे या मुलीला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ही तिन्ही मुलं एकाच कुटुंबातील आहेत त्यामुळे हा घातपाताचा प्रकार नाही ना?  या दिशेने तपास केला जात आहे. 
सोमवारी दुपारच्या सुमारास एकाच कुटुंबातली तीन मुलं बेपत्ता झाली. या मुलांची शोधाशोध सुरु होती. मात्र मुलं न सापडल्याने पोलिसात तक्रार देण्यात आली. एकाच घरातली मुलं असल्याने पोलिसांनी अपहरणाची शक्यता वाटली. पोलिसांनी तपास सुरु केल्यानंतर त्यांना एका कारच्या काचेवर मुलीचा हात दिसला. ही कार तपासली असता त्यात तिन्ही मुलं पोलिसांना सापडली. तिघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच दोन मुलांचा मृत्यू झाला. मुलीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर उपचार सुरु आहेत.
अंगणवाडीतल्या या तीन मुलांचे अपहरण करण्यात आल्याची घटना १५ जुलैला दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करुन सीसीटीव्हीचीही तपासणी केली. मात्र या मुलांचा शोध लागला नव्हता. १६ जुलै म्हणजेच आज गुरुपौर्णिमा आणि ग्रहण असल्याने या तीन मुलांचे अपहरण नरबळीसाठी तर झाले नाही ना? अशीही चर्चा सुरु झाली होती. दरम्यान या तीनपैकी दोन मुलांचा मृत्यू झाला आहे तर एक मुलगी बचावली आहे. तिची प्रकृती गंभीर आहे.  Print


News - Rajy | Posted : 2019-07-16


Related Photos