रस्ते बांधकामाबाबत ना. डाॅ. परिणय फुके यांना निवेदन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया : 
शहरातील  विविध रस्त्यांचे बांधकाम करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन पालकमंत्री  ना. डाॅ. परिणय फुके यांना देण्यात आले. 
 बुलढाणा अर्बन बॅंक ते श्रेया लाॅन पर्यंतचा मंजूर डीपी रोड मागील १५ वर्षापासून अपूर्ण आहे. या रोड वरून दररोज ४  ते ५ हजार लोक आवागमण करतात. त्यात प्रामुख्याने विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणात आहे. सुर्याटोला, परमात्मा नगर, शक्ती मंदीर, बांधतलाव, गायत्री काॅलोनी, साई काॅलोनी, विद्या नगर, टिचर्स काॅलोनी, शांती काॅलोनी, तुलसी काॅनोली, खापर्डे काॅनोली आणि रामनगर परिसरातील काही नागरिक सुध्दा या रोड वरून दररोज येने जाने करतात. डी.बी. सायंस, एन.एम.डी. काॅलेज, बंगाली स्कूल, निर्मल स्कूल, गुजराती स्कूल, चित्रांश स्कुलमध्ये शिकणारे लहान लहान विद्यार्थी आणि वयोवृध्द नागरिक स्टेशन जवळ असल्यामुळे या रोड वरून जाने येने करतात. पावसाळ्यात मात्र या रस्त्यावरून जाने येने शक्य होत नाही. मंजूर असलेला डीपी रोड मागील १५ वर्षापासून अपूर्ण आहे तरी याकडे  लक्ष द्यावे  .
 बांधतलावावर मागील काही दिवसापूर्वी सौंदर्यीकरण झाले. त्यामध्ये शासनाचे जवळपास एक कोटी रूपये खर्च झाले. परंतु कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्यामुळे त्याचे परिणाम आताच दिसु लागले आहे. गोंदिया शहरातील नगर परिषदेच्या हद्दी मध्ये असलेला हा सर्वात मोठा तलाव आहे. या तलावावर सकाळ संध्याकाळ  पायी फीरण्याकरीता वयोवृध्द नागरिक आणि परिसरातील महिला मोठ्या प्रमाणात येतात. वयोवृध्द नागरिकांनी जिल्हापरिषदेचा बांधकाम विभागाकडे अनेकदा तक्रार करून सुध्दा त्यांनी याकडे दुर्लक्ष केले. नुकत्याच झालेल्या या सौंदर्यीकरणाचा कामाची गुणवत्ता तपासून चांगल्या दर्जाचे काम करण्याचे आदेश द्यावे ,  कुडवा नाका ते पालचैक रस्त्याचे भूमिपूजन स्थानिक आमदारांच्या हस्ते मार्च २०१४ मध्ये झाले. परंतु ५ वर्षानंतर सुध्दा या रस्त्याचे बांधकाम सुरू झाले नाही. दवनीवाडा आणि तिरोडा परिसरातील हजारो नागरिक आणि वाहने या रस्त्यानी येतात. दरवर्षी डागडुजीमध्ये या रस्त्यावर बांधकाम विभाग कोट्यावधी रूपये खर्च करते. तरी या रस्त्याचे बांधकाम आणि नालीचे अपूर्ण बांधकाम लवकरात लवकर पुर्ण करण्याचे आदेश द्यावे ,  शहरात होत असलेल्या सिमंेट रस्त्याचे बांधकाम काही ठीकाणी अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत आहे. या बाबीकडे सुध्दा  लक्ष द्यावे अशी मागणी करण्यात आली. 
  पालकमंत्री आणि बांधकाम विभागाचे मंत्री म्हणून   वरिल मांगण्यांवर सकारात्मक विचार करून बांधकाम विभागाला योग्य ते आदेश द्यावेत  आणि आर्थिक टक्केवारीमुळे गोंदिया तालुक्यातील निकृष्ट दर्जाचे रस्ते बांधकामापासून परिसरातील नागरिकांना योग्य न्याय मिळवून द्यावा असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.            
  टि.बी.टोली परिसरातील नागरिकांचे अमर वराडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्र्याना निवेदन देण्यात आले.  यावेळी प्रामुख्याने महाराष्ट प्रदेश काॅंग्रेस कमेटीचे सचिव अमर वराडे, नगर परिषद बांधकाम सभापती बेबी अग्रवाल, सदस्य  हेमलता पतेह, परिसरातील सतीश खंडेलवाल, आनंद अग्रवाल, वि.के. श्रीवास्तव, सुर्यकांत कुंभारे , जितेंद्र कटरे,  सुनिता कटरे,  . शोनल गायकवाड,  सुधा गुप्ता,  आसमा खान,  साधना पांडे,  स्नेहा सिंग,  कामीनी उके,  राखी अग्रवाल,  मेघा वराडे,  सारीका रहांगडाले,  बी.एल. ठाकरे, बी.के. खुणे, दिपक जायस्वाल उपस्थित होते.
यावेळी पालक मंत्र्यानी नगर परिषदचे  मुख्य कार्यकारी अधिकारी आणि बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदनावर योग्य ती कार्यवाही करण्याचे आदेश दिले. 
  Print


News - Gondia | Posted : 2019-07-16


Related Photos