चंद्रपूर जि.प. शिक्षणाधिकारी कार्यालयातील लिपीक बेलाखोडे याला लाच प्रकरणी कारावास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / चंद्रपूर :
कायम विना अनुदानित प्राथमिक शाळेला खाते मान्यता प्रमाणपत्र तयार करून देण्यासाठी शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी घेवून देण्याकरीता १२ हजारांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपीक महादेव तानाजी बेलाखोडे याला कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.
आरोपी कनिष्ठ लिपीक  महादेव तानाजी बेलाखोडे  याने ननिकेत गुरूकुल इंग्लिश मिडीयम प्राथमिक शाळा बालाजी वार्ड बल्लारशाह या कायम विना अनुदानीत प्राथमिक शाळेला खाते मान्यता प्रमाणपत्र तयार करून शिक्षणाधिकारी यांची स्वाक्षरी घवुन देण्यासाठी १२ हजार रूपये लाचेची मागणी करून स्वीकारली. याप्रकरणी  २१ ऑक्टोबर २००८ रोजी   रामनगर  पोलिस ठाण्यात कलम ७, १३, (१) (ड), सह कलम १३ (२) ला.प्र.का. १९८८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास पुर्ण करून  न्यायालयात दोषारोप पत्र सादर करण्यात आले.  जिल्हा सत्र न्यायाधिश दिपक भेंडे, यांच्या न्यायालयात सदर खटला चालविण्यात आला.  काल १५ जुलै रोजी  न्यायालयाने आरोपी महादेव तानाजी बेलाखोडे  यांना १३(२) लाप्रका मध्ये १ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड दंड न भरल्यास २ महिने सश्रम कारावासाची शिक्षा व ७ लाप्रका. मध्ये ६ महिने सश्रम कारावास व १ हजार रुपये दंड, दंड न भरल्यास १ महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्याचा तपास  तत्कालीन पोलीस उप अधिक्षक तोडासे,  पोहवा आप्पा जुनघरे  यांनी पुर्ण करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षाच्या वतीने जिल्हा शासकीय अभियोक्ता ॲड. संदीप नागापुरे यांनी काम पाहिले व त्यांना पोलीस उपअधीक्षक अविनाश भामरे,  नापोशि अरूण हटवार लाप्रवि चंद्रपूर यांनी सहाय्य केले.   

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-16


Related Photos