जवाहर नवोदय विद्यालयाचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा


- जिल्ह्यातील  पालकांची उपस्थिती,पालकांनी मांडल्या विविध समस्या
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
केंद्र शासनाच्या मानव संसाधन विकास मत्रांलयाअंतर्गत येणाऱ्या  घोट येथील जवाहर नवोदय विद्यालयाच्या समस्याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंग यांनी प्रत्यक्ष विद्यालयाला भेट देवून पालकांसमोर विविध समस्या व विकासात्मक बाबींचा आढावा घेतला.
 याप्रसंगी उपस्थित पालकांनी जिल्हाधिकारी शेखर सिंगं यांचे समोर विविध समस्यांचा पाढाच वाचून विविध समस्या मार्गी लावण्याची विनंती जिल्हाधिकारी यांना केली.
 जवाहर नवोदय विद्यालयाच्या वनजमीनीचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येवून प्रथम स्तरावर बाधंकाम विभागाने विद्यालय परिसरात सरंक्षण भिंत,रस्ते,पथदिवे शुद्ध पाणी,विद्यालयातील वसतीगृह दुरूस्ती करिता व इतर सोयीसुविधा पुरविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करावे असे निर्देश शालेय प्रशासन व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जिल्हाधिकारी यांनी दिले.
आढावा बैठकीला जवाहर नवोदय विद्यालयाचे प्राचार्य जी कोटय्या,सार्वजनिक बाधकांम विभागाचे उपअभियंता उरकुडे,नायब तहसिलदार अविनाश पिसाळ,उपप्राचार्या साधना दलेला,घोटचे वनपरिक्षेत्र  अधिकारी शेखर तनपूरे आदी उपस्थित होते. 
यावेळी जिल्हाधिकारी यांनी आढावा बैठकीनतंर विद्यालयाच्या परिसरातील मुले व मुलींचे वसतीगृह, भोजनकक्ष या ठिकाणी भेट देवून प्रत्यक्ष पाहणी केली . बांधकाम विभागाने आवश्यक बाबीच्या प्रस्ताव सादर करावा असे निर्देश दिले.यासह आपल्या स्तरावरील विकास कामांना गती देवून समस्या सोडविण्यात येतील असे जिल्हाधिकारी यांनी उपस्थित  पालकांना सांगितले.
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-15


Related Photos