महत्वाच्या बातम्या

 आधार कार्ड ला मोबाईल क्रमांक लिंक करा : आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबास पाच लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा देण्यात येतो. आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड ई-केवायसी करण्यासाठी आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक असणे आवश्यक आहे. त्यामुळे नागरिकांनी जवळच्या अधिकृत आधारकार्ड सेवा केंद्रावर जाऊन आधारकार्डला मोबाईल क्रमांक लिंक करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल कर्डिले यांनी केले आहे.

आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत लाभार्थी कुटुंबास ५ लाख रुपयांपर्यंत आरोग्य विमा देण्यात येतो. या योजनेमध्ये १ हजार २०९ शस्त्रक्रिया, चिकित्सा, उपचारांचा समावेश आहे. जिल्ह्यात ११ लाख ४९  हजार ६७ एवढे लाभार्थी असून २ लाख ५० हजार लाभार्थ्यांनी आयुष्मान भारत गोल्डन कार्ड काढले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos