कोंडेखाल येथील हरविलेल्या मुलीला दिल्लीतुन शोधून आणण्यात सावली पोलिसांना यश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / साखरी (सावली) : 
सावली तालुक्यातील कोंडेखल येथील काशीनाथ रावजी भैसारे यांची मुलगी  पूनम भैसारे (१८)  ही १२ जून रोजी   हरविल्याबाबत सावली  पोलिस ठाण्यात  तक्रार दिली होती . त्यावरून पो.स्टे.सावली मध्ये  नोंद घेऊन शोध चालू केला असता  पूनम दिल्ली येथे असल्याचे आढळून आले. तिला दिल्ली येथून परत आणण्यात आले आहे. 
पूनम कडे मोबाइल नव्हता. ९ जुलै रोजी  सायंकाळी  पूनम भैसारे हिने एका मोबाइल वरुन तिची बहिण  जयश्री (२०) हिच्याशी संपर्क केला.  तिला  दिल्ली येथे एका महिलेने तिच्या घरी व दुकानात ठेवले असून तिला जेवण देत नाही मारहाण करते व कागदपत्र घेवून तिला मोबाइल वापरण्यास देत नाही व बाहेर जाऊ देत नाही असे सांगून फोन कट केला. जयश्री हिने तात्काळ सावली पो.स्टे.गाठून सदर माहिती पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांना दिली . पोलिस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी त्याची तात्काळ दखल घेऊन हरविलेल्या मुलीने केलेल्या मोबाइलवर तात्काळ संपर्क साधुन माहिती घेतली. असता   किरण महतो हिने  दिल्ली येथे ठेवल्याचे सांगितले. त्यावेळी दिल्लीचा पूर्ण पत्ता माहिती नसल्याचे सांगितले.  फक्त शंकरपुर दिल्ली असे सांगण्यात आले . ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी चंद्रपुर कंट्रोल रूम, नागपुर कंट्रोल रूम ला संपर्क साधुन दिल्ली कंट्रोल रूमचा नंबर घेण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर  पोलीस महासंचालक कार्यालय  मुंबई येथे संपर्क साधुन दिल्ली कंट्रोल रूम चा क्र.प्राप्त करून दिल्ली कन्ट्रोल ला माहिती दिली . ठाणेदार बाळासाहेब खाडे यांनी रिझनल कंट्रोल ला संपर्क साधुन घटनेची माहिती दिली.  सदर डी.सी.पी.  यांनी स्थानिक ठाणेदार यांना सांगून एक अधिकारी व चमूला  दिलेल्या पत्याचा शोध घेवून मुलीची सूटका केली. 
 त्यावेळी त्यांना मुलीला दोन दिवस सुरक्षित ठेवण्यास सांगून घटनेची माहिती  चंद्रपूरचे पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी  याना सांगून सदर मुलीला ताब्यात घेण्याबाबत सावली पोलिस स्टे.ची चमू  पाठविण्याची परवानगी घेवून पो.स्टे.सावलीचे पो.हवा.दादाजी बोलीवार ना पो शि बंडू तोडासे यांना पाठविण्यात आले. सदर मुलीला दिल्ली येथून ताब्यात घेवून सावली येथे आणून तिची बहिण जयश्री व आईवडिलांच्या सुपूर्द करण्यात आले.  सर्वांनी  पोलीस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, ठाणेदार बाळासाहेब खाडे   व सावली पोलिसांचे आभार मानले. मुलगी दिल्ली येथे कशी पोहचली या बाबत अधिक तपास सुरु आहे. 
  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-15


Related Photos