माजरी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाऱ्याचा अपघाती मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / वरोरा :
माजरी पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस शिपायाची दुचाकी ट्रकच्या  मागील चाकात आल्यामुळे जखमी झालेल्या पोलिस शिपायाचा रूग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सुनिल धलाल खरोले (३०) असे मृतक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. ते काही महिन्यांपासून माजरी पोलिस ठाण्यात कार्यरत होते. एमएच ३४ एएम ६४८१ क्रमांकाच्या मोपेड दुचाकी वाहनाने ते पोलिस ठाण्याच्या कामानिमित्त वरोरा येथे येत होते. दरम्यान एमएच ४० एन ६७०९ क्रमांकाच्या ट्रकच्या मागील चाकात त्यांची दुचाकी गेल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारार्थ वरोरा उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. चार महिन्यांपूर्वीच मृतक पोलिस कर्मचाऱ्याचा  विवाह झाला होता, अशी माहिती निकटवर्तीयांनी दिली आहे. ट्रक  चालकास माजरी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-15


Related Photos