महत्वाच्या बातम्या

 सिंदी रेल्वे हे कबड्डीचे माहेर घर : खासदार रामदास तडस


- स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत कबड्डी मॅट उद्घाटन सोहळा संपन्न

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : सिंदी करिता अनेक विकास कामे या मागील दहा वर्षात करण्यात आली आहेत. या ठिकाणी रेल्वे उड्डाण पूल मंजुरी असो किंवा लॉजीस्टिक पार्क असो त्याच प्रमाणे सिंदी-सेलडोह-कांढळी हा राष्ट्रीय मार्ग असो या व्यतिरिक्त सिंदी च्या विकासासाठी हायमास्ट सह अनेक विकास कामे पुर्ण केली आहे, एक ओपन जिम आणि आता कबड्डी मॅट आदी विकास कामे केलेली आहे. सध्या देशात कबड्डी ही मॅट वर खेळल्या जात असल्याने व सिंदी हे कबड्डीचे माहेर घर असल्यामुळे येथील कबड्डी खेळाडूची मागणी लक्षात घेत कबड्डी मॅट देण्यात आली आहे. या मॅटचा उपयोग कबड्डी खेळाडुंनी नियमीत घ्यावा व आपल्या गावाचे नाव मोठे करावे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी केले. तसेच विदर्भस्तरीय मॅट वरील कबड्डी सामने आयोजित केल्यास त्या करिता संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन खा. तडस यांनी यावेळी दिले.

सिंदी रेल्वे ता. सेलू येथे खासदार रामदासजी तडस यांच्या स्थानिक विकास निधी अंतर्गत कबड्डी मॅट चे उद्घाटन रामदास तडस याच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी नवयुवक क्लब चे अध्यक्ष अशोक कलोडे, सचिव सुधाकर खेडकर, साई स्पोर्टींग क्लब चे अध्यक्ष गंगाधर कलोडे, आशिष देवतळे, सुधाकर घवघवे, विद्या निकेतन संस्थाचे सचिव संजय भन्साली, प्रवीण सिर्सिकर, स्नेहल कलोडे आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन अमोल सोनटक्के तर उपस्थिताचे आभार राहुल कलोडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गौरव कलोडे, राहुल कलोडे, रामेश्वर घंगारे, राम सोनटक्के, मोहम्मद इमरान, धनराज झिलपे, धर्मेंद्र झाडे, सागर अंभोरे, गुल्लू भन्साली आदीनी प्रयत्न केले. कार्यक्रमाला मोठया संख्येने नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos