शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचावी : पालकमंत्री डॉ परिणय फुके


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गोंदिया तर्फे गोंदिया जिल्हयातील  १लाख २० हजार  लोकांना गॅस कनेक्शन वाटप करण्यात येणार आहे . तसेच ६ लाख १८ हजार ६५०  लोकांना शिधा पत्रिका (राशन कार्ड ) वाटप करण्यात येणार आहे. या योजनेतर्फे नागरिकांना १० किलो गहू २  रु. व २५ किलो तांदूळ ३  रु प्रमाणे मिळणार आहेत.  यामुळे  शेवटच्या घटकापर्यंत योजना पोहचावी  व १४ ऑगस्ट पर्यत हि योजना पूर्णपणे कार्यन्वित करण्यात यावी असे  निर्देश  पालकमंत्री ना. डॉ. परिणय फुके यांनी  दिले.
आज गोंदिया येथे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग गोंदिया मार्फत पं.दीनदयाल उपाध्याय अंत्योदय अभियान या कार्यक्रमाचे शुभारंभ पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राज्यमंत्री तथा पालकमंत्री गोंदिया डॉ परिणय फुके यांच्या हस्ते लाभार्थी महिलांना गॅस कनेक्शन व शिधा पत्रिका (राशन कार्ड) वाटप करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.  
कार्यक्रमाला आमदार   विजय  रहांगडाले, जिल्हाधिकारी डॉ कादंबरी बलकवडे, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ दयानिधी राजा, पुरवठा अधिकारी सुभाष चौधरी व इतर अधिकारी वर्ग तसेच मोठ्या संख्येनी लाभार्थी उपस्थित होते.  Print


News - Gondia | Posted : 2019-07-15


Related Photos