बल्लारपुर - आष्टी महामार्गालगतच्या गावकऱ्यांनी कळमना येथे केला महामार्ग बंद


- चुकीच्या रस्त्याच्या बांधकामामुळे नागरिकांत रोष 
- राजु झोडे यांच्या नेतृत्वात केला चक्का जाम 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / बल्लारपूर : 
बल्लारपूर ते आष्टी महामार्गावरील रस्त्याचे काम सुरु आहे. हे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने होत असुन या महामार्गावरिल लगतच्या गावांना ह्या कामाचा मोठ्या प्रमाणात फटका बसल्यामुळे त्या परिसरातील गावकर्यांनी राजु झोडे यांच्या नेतृत्वात तब्बल दोन तास महामार्ग रोखुन जोरदार नारेबाजी केली. समस्याग्रस्त गावकऱ्यांनी सदर कामाबाबत तक्रार करुन निवेदन देऊनही  एका आठवड्यात कामात दुरस्ती केली नाही त्यामुळे परिसरातील संतप्त गावकर्यांनी राजु झोडे यांच्या नेतृत्वात शेकडोच्या संख्येनी संपुर्ण महामार्गाला बंद करुन आक्रोश व्यक्त केला.
 सदर महामार्गावरील लागुन असलेल्या घरांना ह्याचा सर्वात जास्त त्रास होत असुन रस्त्यालगत राहणाऱ्या लोकांच्या घरापेक्षाही उंच बांधकाम केल्यामुळे लोकांना घरामध्ये  जाणे -  येणे करण्यासाठी रस्ताच उरला नाही. कऴमना ,दहेली,कोठारी ,आमडी , येनबोडी,या गावातील रस्त्यालगतच्या लोकांना आपल्या घरात जायलासुद्धा मोठी अडचण होत असुन लहान बालके, वृद्धांचा  जिव धोक्यात आला आहे. लोकांची पाळिव जनावरे सुद्धा घरी न आणता बाहेरच ठेवावे लागत आहे. रस्त्याच्या काठाने उंच उंच नाली बांधकाम केल्याने पावसाचे पाणि व सांडपाणी अंगणात व घरात घुसत असुन मोठ्या समस्यांचा सामना करावा लागत आहे हे फार चुकीचे असुन या महामार्गालगतच्या जनतेचे मोठे हाल होत असुन विकासाच्या नावाने मोठी पिळवणुक होत आहे हे बांधकाम चुकीच्या पद्धतीने होत असुन जनतेचे जिवन जगण्याचे स्वांतत्र्य हिरावण्याचा प्रकार सुरु आहे.  हे फार गंभिर असुन सर्व समस्याग्रस्त गाववाशियांनी  महामार्गचे काम बंद करुन रास्ता रोको आंदोलन केले. नागरिकांचा रोष बघता पोलिस प्रशासन , महामार्ग अधिकारी व कंत्राटदार  आंदोलन ठिकाणी येऊन समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
  सबंधित प्रशासनाने व कंत्राटदाराने चर्चा करुन महामार्गालगत समस्याग्रस्त गावकर्यांची समिती नेमुऩ ज्या काही समस्या आहेत त्या पुर्ण करण्याचे आश्वासन दिले. सदर रास्ता रोको आंदोलनात राजु झोडे ,सुनिल बावने,विलास शेडमाके,पुरुषोत्तम मोरे,सुभाष निमगडे,राजु काटोले,ज्योस्तना उमरे,मदन मोरे,सुनंदा मोरे,सदाशिव मोरे ,गोविंदा उपरे,सुर्यकांत दयालवार, सुरज थेरे ,धिरज थेरे, प्रभाकर मोरे ,अक्षय देरकर ,सुभाष तेलतुंबडे तसेच परिसरातील शेकडो गावकऱ्यांनी सहभाग घेतला.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-15


Related Photos