महत्वाच्या बातम्या

 निवडणुकीत चक्क घरकुलाचे आश्वासन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / देसाईगंज : तालुक्यातील नव्यानेच स्थापन झालेल्या गांधीनगर ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. 

उमेदवार मतदारांना विविध प्रलोभने देत आहेत, चक्क मतदारांना घरकुल मिळवून देतो, असे आश्वासन देत आहेत. उमेदवार चक्क मतदारांच्या घरी जाऊन आपण निवडून येण्यासाठी घरकुल, आर्थिक मदत आदींची प्रलोभने देत आहेत. घरकुल मंजुरीसाठी कितीतरी टेबलवरून लाभार्थ्यांची यादी या कार्यालयातून त्या कार्यालयात जात असते. इतरही उमेदवार विविध प्रकारची आश्वासने देत आहेत. पहिलीच निवडणूक असल्याने मतदारांमध्ये उत्साह आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos