सर्च मध्ये मणक्याच्या दुखण्याने ग्रस्त ११९ रुग्णांची तपासणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी /  गडचिरोली :
सर्च येथील मा दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात नुकतेच पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजारांचे निदान शिबिर घेण्यात आले. शिबिरात मणक्याच्या दुखण्याने ग्रस्त ११९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. मुंबई येथील स्पाईन फाउंडेशन मधून आलेले डॉ. निशांत कुमार, डॉ. जयेश भानुशाली आणि डॉ. आदेश काशीकर या तज्ञ डॉक्टरांनी ही तपासणी केली.
श्रमाची कामे करताना कंबरेवर आणि मणक्यावर जास्तीचा ताण पडतो. त्यामुळे पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजार बळावत असल्याचे सर्च मध्ये वेळोवेळी उपचारासाठी आलेल्या रुग्णांना तपासताना निदर्शनात येते. कंबरेचे दुखणे वाढून ते पायात जाणे, मणक्यातील पोकळी वाढून नस चिपकणे असे प्रकार घडून दुखण्याचा त्रास लोकांना सहन करावा लागतो. ही बाब लक्षात  घेत सर्च द्वारे मा दंतेश्वरी धर्मादाय दवाखान्यात नुकतेच पाठ, कंबरदुखी व मणक्यातील आजारांचे निदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात मणक्यातील दुखण्याने ग्रस्त ११९ रुग्णांची तपासणी करण्यात आली. औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिबिरासाठी सहकार्य केले. दवाखान्याच्या संचालक डॉ. राणी बंग यांच्या मार्गदर्शनात डॉ. योगेश कालकोंडे, डॉ. चैतन्य मलिक, डॉ. मृणाल कालकोंडे, डॉ. दत्ता भलावी, डॉ. शिल्पा मलिक, डॉ. मयुरी भलावी, डॉ. अभिषेक पाटील, डॉ कोमल भट, डॉ. मयूर भानारकर आणि डॉ. प्रतिक सुराणा यांनी शिबिराची संपूर्ण व्यवस्था सांभाळली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-07-15


Related Photos