महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या उमेदवारांकरीता स्पर्धा पुर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, गडचिरोलीच्या वतीने जिल्ह्यातील अनुसुचित जमातीच्या उमेदवांराकरीता MPSC पुर्व प्रशिक्षण, जिल्हा निवड समीतीच्या विविध पदभरती बाबत तसेच IBPS, SSC च्या परीक्षा बाबत स्पर्धा पुर्व
प्रशिक्षण कार्यक्रम विनामुल्य राबविण्यात येत आहे. सदर प्रशिक्षण घेऊ इच्छीणा-या उमेदवांराकडे शालांत परीक्षा उतीर्ण प्रमाणपत्र व रोजगार नोंदणी कार्ड (EMPLOYMENT CARD ) असणे आवश्यक आहे.

प्रशिक्षणाचा कालावधी साडेतीन महीने आहे. प्रशिक्षणा दरम्यान रु.१०००( एक हजार रुपये ) दरमहा विदयावेतन दिले जाईल. प्रशिक्षण पुर्ण करणा-या उमेदवांराना चार पुस्तकांचा संच व प्रमाणपत्र देण्यात येते. कार्यालयात अर्ज विनामुल्य उपलब्ध आहेत. तसेच अर्ज २८ नोव्हेंबर २०२३ पर्यंत या कार्यालयात सादर करावेत त्यांनतर मुलाखत २९ नोव्हेंबर २०२३ रोजी आदिवासी उमेदवांराकरीता कौशल्य विकास, रोजगार व उदयोजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.२ गडचिरोली येथे घेण्यात येणार आहे. त्याकरीता उपस्थ‍ित राहावे. अधिक माहितीसाठी कार्यालयाच्या ०७१३२ -२९५१४३/८४८५८१४४८८ या क्रमाकांवर संपर्क साधावा. असे आवाहन कौशल्य विकास रोजगार व उदयोजकता मार्गदर्शन अधिकारी यांनी केले आहे. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos