महत्वाच्या बातम्या

 श्री. छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रिडा मंडळ, ठाकरी तर्फे आयोजित कबड्डी सामन्याचे बक्षीस वितरण 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / आष्टी : श्री. छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रिडा मंडळ, ठाकरी यांच्या सौजन्याने ठाकरी येथे भव्य दिवस व रात्री कबड्डी सामने १६-१७ व १८ नोव्हेंबर २०२३ पर्यंतच्या कालावधीत आयोजित करण्यात आले होते. 

यामध्ये दोन गटात सामने झाले होते. या सामन्यात विजयी खेडाळूना अ आणि ब गटासाठी प्रत्येकी चार बक्षीस ठेवण्यात आले होते. 

या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला संजय पंदिलवार अध्यक्ष प्रशांतधाम देवस्तान चपराळा आणि कुंदन गावडे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी प्रमुख उपस्थिती होती. 

अ गट प्रथम बक्षिस २० हजार- उमरी पोतदार यूपी, अ गट द्वितीय बक्षीस १५ हजार- श्री. छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रिडा मंडळ, ठाकरी,  अ गट तृतीय बक्षिस १० हजार- छत्रपती क्रिडा मंडळ, अनखोड़ा, अ गट चतुर्य चक्षिस ६ हजार- बजरंगबली क्रीड़ा मंडळ ठाकरी, ब गट प्रथम बक्षिस १० हजार- उमरी पोतदार यूपी, ब गट व्दितीय बक्षिस ७ हजार- कार्तीक स्वामी क्रीड़ा मंडळ ठाकरी, ब गट तृतीय बक्षिस ५ हजार- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आष्टी, ब गट चतुर्य चक्षिस ३ हजार- बजरंगबली क्रीड़ा मंडळ ठाकरी हे गट बक्षीसाचे मानकरी ठरले होते. 

या गटाना संजय पंदिलवार अध्यक्ष प्रशांतधाम देवस्तान चपराळा आणि कुंदन गावडे पोलिस निरीक्षक पोलिस स्टेशन आष्टी यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. 

यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक व छत्रपती शिवाजी महाराज युवा क्रिडा मंडळ, ठाकरी सदस्य उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos