'चांद्रयान-२' चे आजचे प्रक्षेपण रद्द, लवकरच नव्या तारखेची घोषणा करणार


वृत्तसंस्था / श्रीहरिकोटा :  तांत्रिक अडचणीमुळे 'चांद्रयान-२' चे आज १५ जुलै रोजी होणारे चे प्रक्षेपण रद्द करण्यात आले असून लवकरच नव्या तारखेची घोषणा केली जाणार असल्याची माहिती  इस्रोकडून देण्यात आली  आहे. आज   पहाटे २ वाजून ५१ मिनिटांनी सतीश धवन स्पेस सेंटर येथून GSLV मार्क-३च्या मदतीने चांद्रयान-२ अवकाशात झेपवणार होते. 
चंद्राच्या उदरात प्रचंड प्रमाणात ऊर्जा सामावलेली आहे. ही ऊर्जा पृथ्वीवर आणता आली तर मोठेच घबाड हाती लागणार आहे. या मोहिमेद्वारे चंद्राच्या दक्षिण ध्रुव प्रदेशातील पाण्याचे व हेलियम-३चे नमुने निरीक्षण केले जाणार आहेत. हेलियम-३ मुळे पृथ्वीवरची ऊर्जासमस्या सुटण्यास मोठी मदत होणार आहे. हे संशोधन खूप महत्त्वाकांक्षी ठरणार आहे. 
चांद्रयान-२ या मोहिमेद्वारे इतर महत्त्वाचे संशोधनही करण्यात येणार आहे. चंद्राच्या दक्षिणेकडील पृष्ठभागातील घटकांचा अभ्यास,चंद्रावर होणार्या भूकंपाची नोंदणी, चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळच्या पृष्ठभागाच्या नकाशाची नोंदणी, चंद्रासंबंधीची नवीन माहिती मिळविणे इत्यादी उद्दिष्टे ठरविण्यात आली आहेत. विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही मोहीम कमीतकमी खर्चाची आहे. या मोहिमेद्वारे करण्यात येणारे संशोधन हे केवळ भारतालाच नव्हे, तर संपूर्ण जगाच्या हितासाठी उपयुक्त ठरणार आहे. 

 'चांद्रयान-२' ची वैशिष्ट्ये

चांद्रयान-२ एकूण १२ भारतीय उपकरणे घेऊन जाणार आहे.
चांद्रयान-२ चे वजन ३.८ टन इतके आहे. आठ हत्तींच्या वजनाच्या इतके आहे हे वजन
चांद्रयान-२ चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणार आहे. आजपर्यंत चंद्राच्या सर्व भागापर्यंत पोहोचणारी मोहीम झालेली नाही.
यात १३ भारतीय पेलोड असतील त्यातील ८ ऑर्बिटर, ३ लँडर आणि २ रोव्हर असतील. याशिवाय नासाचे एक पॅसिव्ह एक्सपेरिमेंट देखील असेल.
  Print


News - World | Posted : 2019-07-15


Related Photos