महत्वाच्या बातम्या

 स्थानिक पातळीवर नागरिकांना विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे : खा. रामदास तडस


- सेवाग्राम, आष्टा, वायगांव येथे रु. ५० लक्ष किमतीचे विविध विकासकामांचे भुमीपूजन कार्यक्रमन संपन्न.

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : केंद्र व महाराष्ट्र सरकार हे विकासात्मक सरकार आहे, विकासाला प्राधान्य देऊन कार्य करीत आहे, महाराष्ट्र सरकारच्या वतीने २५१५ व जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत विविध ठिकाणी निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, आज विविध विकास कामांचे भुमीपूजन व लोकार्पन संपन्न होत आहे, यामध्ये सिमेंट रस्ते, विविध विकास कामांचा समावेश आहे, तसेच आपण सर्वांनी स्थानिक पातळीवर नागरिकांना विविध केंद्र व राज्यशासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन खासदार रामदास तडस यांनी यावेळी व्यक्त केले. ते विविध विकास कामांच्या भुमीपूजन प्रंसगी बोलत होते.

सेवाग्राम, आष्टा, वायगांव येथे २५१५ व जिल्हा वार्षीक योजना अंतर्गत भुमीपूजन व लोकार्पन सोहळा खासदार रामदास तडस यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य सुनिल गफाट, जिल्हा नियोजन समिती सदस्य राजेश बकाने, राहुल चोपडा, नंदकिशोर झोंटीग, रमेश वाळके, प्रविण काटकर, निलेश तिजारे, प्रमोद चव्हाण उपस्थित होते. तसेच आष्टा येथे आयुष्मान भारत योजने अंतर्गत कार्डचे वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रमाला विविध ठिकाणी सरपंच कल्पना काटकर, उपसरपंच शालु मोहर्ले, विठ्ठलराव भोगे, अरुण ढोंबळे, गणेश वादांडे, विनोद घोडखांदे, प्रविण घोडखांदे, बाबाराव घोडे, बालाजी वरघने, राहुल कडू, शंकरराव जाधव, प्रकाशजी वाळके, सतीश नागमोते, रवींद्र उगले तसेच भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Wardha




Related Photos